FPI व्याज उत्पन्नावर 5% सवलतीच्या दराने टॅक्स लागू होणार – CBDT

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आयकर विभागाने (Income Tax Department) हे स्पष्ट केले आहे की, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या (Foreign Portfolio Investors) व्याज उत्पन्नावर 5 टक्के सवलतीच्या दराने कर आकारला जाईल.

विद्होल्डिंग टॅक्सच्या स्थितीत कोणताही बदल नाही
प्राप्तिकर विभागाने यासंदर्भातील अहवालावरील परिस्थितीचे स्पष्टीकरण देताना बुधवारी सांगितले की, FPI च्या व्याज उत्पन्नावर पाच टक्के दराने लागू विद्होल्डिंग टॅक्सच्या अटीत कोणताही बदल झालेला नाही. या प्रकारचा टॅक्स मागे घेण्यात आल्याच्या बातम्या आल्या आहेत.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (Central Board of Direct Taxes) एका निवेदनात म्हटले आहे की, “हे स्पष्ट केले जात आहे की, आयकर कायद्यातील कलम 115 एडीमध्ये बदल करूनही संबंधित तरतुदीमध्ये कोणताही बदल केलेला नाही.” टॅक्स आणि इतर कायदे (विविध तरतुदींमध्ये दुरुस्ती व सवलत) अधिनियम 2020 च्या माध्यमातून या कलमात सुधारणा करूनही कायद्याच्या कलम 194एलडी मध्ये नमूद केलेले व्याज उत्पन्नावर पाच टक्के सवलतीच्या दराने कर आकारला जाईल.”

FPI उत्पन्नावर टॅक्सची तरतूद
आयकर कायद्याच्या कलम 115एडी मध्ये FPI उत्पन्नावर टॅक्सची तरतूद करण्यात आली आहे, तर कलम 194एलडी मध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार किंवा पात्र परदेशी गुंतवणूकदारांच्या विविध संस्थात्मक बाँडच्या सरकारी सिक्युरिटीजकडून मिळणार्‍या व्याज उत्पन्नावरील विद्होल्डिंग टॅक्सच्या उल्लेख केला गेला आहे. बाँड किंवा डिबेंचर जारी करणार्‍यांना आता एफपीआयच्या खात्यात मॅच्युरिटीची रक्कम जमा करण्यापूर्वी पाच टक्के टॅक्स सरकारी तिजोरीत जमा करावे लागेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment