CBIने सुशांत प्रकरणाचा लवकरात लावर अहवाल द्यावा- गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरण अनेक वळणं घेत आता एका निष्कर्षावर येताना दिसत आहे. गेले कित्येक दिवस माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात सुशांतची हत्या झाल्याचे दावे केले जात होते. मात्र आज एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतची हत्येचा दावा फेटाळला आहे. सुशांतने आत्महत्याचं केली असल्याचा अहवाल एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयला सुपूर्द केला आहे. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयने आता लोकांना सांगावे, लवकरात लवकर चौकशीचा अहवाल द्यावा, अशी मागणी केली आहे.

अनिल देशमुख नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांना सुशांतच्या एम्स अहवालावरून प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी आमच्याकडे अधिकृत माहिती नाहीय. जशी माहिती मिळेल तशी आम्ही ती कळवू. यामुळे यावर काही वक्तव्य करणे उचित नाही. सीबीआय जी चौकशी करत आहे, तिचा अहवाल लवकरात लवकर यावा, लोकांच्या समोर यावा, यामुळे लोकांनाही सुशांतची हत्या की आत्महत्या ते समजेल, असे देशमुख म्हणाले.

एम्सचा अहवाल
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने उलटले असून या प्रकरणी दर दिवशी नवीन खुलासे समोर येत आहे. १४ जून, २०२० रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. पण ही आत्महत्या आहे की हत्या, हे स्पष्ट झालेले नाही. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (All India Institute Of Medical Sciences, New Delhi)च्या डॉक्टरांच्या एका पॅनेलने सीबीआयला आपले मत देत सांगितले की अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या नाही झाली तर हे आत्महत्येचे प्रकरण आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like