नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळ स्थगित करण्यात आलेल्या CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. आज शुक्रवारी ८ मे रोजी डॉ. पोखरियाल यांनी या परीक्षांच्या वेळापत्रबाबत माहिती दिली. एएनआय या वृत्तसंस्थेनं CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार याबाबतची घोषणा करणारा डॉ. पोखरियाल यांचा एक विडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.
यात डॉ. पोखरियाल यांनी CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या रखडलेल्या परीक्षा येत्या जुलै महिन्यात घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. येत्या १ जुलै ते १५ जुलै यादरम्यान ह्या परीक्षा CBSE बोर्डाकडून घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी मिळालेला वेळेचा फायदा घेत परीक्षेची चांगली तयारी करण्याचे आवाहन डॉ. पोखरियाल यांनी केलं आहे.
#WATCH CBSE will conduct pending class 10th and 12th board exams from July 1st to July 15th: Union HRD Minister Ramesh Pokhriyal pic.twitter.com/JTW2067cvQ
— ANI (@ANI) May 8, 2020
गेल्या मंगळवारी, NEET आणि IIT-JEE (Main) परीक्षांची घोषणा करताना CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर करण्याचं डॉ. पोखरियाल यांनी म्हटलं होत. दरम्यान, येत्या जुलै महिन्याच्या १८, २०, २१, २२ आणि २३ तारखांना IIT-JEE Main परीक्षा घेण्यात येणार आहेत. तर IIT-JEE Advance परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. याचबरोबर NEETची परीक्षा २६ जुलैला घेण्यात येणार असल्याचे डॉ. पोखरियाल यांनी जाहीर केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”