सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा येथील धनंजय गाडगीळ कॉलेजमध्ये ट्रेडीफेअर डे साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटनासाठी सैराट फेम सिने कलाकार आकाश ठोसर म्हणजेच परश्या यांच्या हस्ते करण्यात आला होता. यावेळी ढोल- ताशाच्या गजरात तरूणाईंने आकाशचे स्वागत केले. त्याला पाहण्यासाठी काॅलेजमधील मुला- मुलींनी परिसर गजबजून गेला होता.
कॉलेज युवक- युवतींना उद्योग व्यवसाया विषयी प्रत्यक्ष माहितीचा अनुभव या निमित्ताने प्रत्येक स्टॉलवर अनुभवायला मिळत आहे. व्यवसायाशी निगडित अनेक प्रकारचे स्टॉल या ट्रेडिफेअर डे मध्ये उभारण्यात आले होते. धनंजय गाडगीळ काॅलेजमध्ये 2012 पासून ही संकल्पना राबवली जात आहे. या उपक्रमात लाखो रुपयांची उलाढाल एका दिवसामध्ये होत असून याला विद्यार्थी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सैराट परश्या साताऱ्यात कॉलेजमध्ये : नुसतं झिंग झिंग झिंगाट pic.twitter.com/Lph3WJjxNW
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) February 16, 2023
चालू आठवड्यात व्हॅलेंनटाईन डे, प्राॅमिस डे, चाॅकलेट डे साजरे केले जात आहेत. याच कालावधीत ट्रेडिफेअर डे साजरा केला जातो. याच दरम्यान दरवर्षी धनंजय गाडगीळ काॅलेजमध्ये विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायांच्या माहितीसाठी ट्रेडिफेअर डे साजरा करण्याची परंपरा गेल्या 10 वर्षापासून आहे. परंतु गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे खंडा पडलेला होता, तो पुन्हा यंदापासून सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.