मुलीच्या जन्माचा आनंद मुलीच्या वडिलांनी हटके साजरा केला; हेलिकॉप्टरने घरी आणले मुलीला

0
97
Helicopter to bring baby home
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानमधील एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेतले आणि तिला पहिल्यांदा त्यातच आणले घरी. नवजात मुलीला प्रथमच हेलिकॉप्टरने तिच्या वडिलोपार्जित घरी आणले होते. ही घटना नागौर जिल्ह्यातील निंबडी चंदावतम गावची आहे. स्थानिक रहिवासी हनुमान प्रजापत याने हेलिकॉप्टर भाड्याने घेतल्यानंतर पहिल्यांदा मुलीला तिच्या मामाकडून आणले.

ते म्हणाले, ‘आम्हाला आमच्या मुलीचे प्रथम आगमन आमच्या अंगणात विशेष करायचे होते. माझी मुलगी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी किती विशेष आहे हे दर्शविण्यासाठी मी जास्तीत जास्त हे करु शकलो. हनुमानची पत्नी चूका देवी यांनी 3 मार्च रोजी नागौर जिल्हा रुग्णालयात मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर त्या मुलीला घेऊन हर्सोलाव या आपल्या माहेरगावी गेल्या. आणि तिथूनच हेलिकॉप्टरने आपल्या सासरी परतल्या.

हनुमानाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे वडिल मदनलाल यांची अशी इच्छा होती की, मुलीचा जन्म मनापासून साजरा केला जावा आणि मुलगी पहिल्यांदा हेलिकॉप्टरने घरी आणण्याची योजना आखली गेली. निंबडी चंदावता ते हर्सोलव हे अंतर रस्त्याने सुमारे 40 किमी आहे आणि हेलिकॉप्टरने हे अंतर पार करण्यास 10 मिनिटे लागतात. हनुमानाने मुला-मुलींमध्ये भेद न करण्याचा आग्रह धरला आणि असे सांगितले की, मुलगी (रिया) झाल्याने त्याचे संपूर्ण कुटुंब खूप आनंदित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here