Wednesday, June 7, 2023

पूर्ववैमनस्यातून २४ वर्षीय तरुणाचा खून, दोघेजण ताब्यात

अकोला : हॅलो महाराष्ट्र – पूर्ववैमनस्यातून एका २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना अकोट शहरातील अकबरी प्लॉट परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतले आहे. हि घटना बुधवारी रात्री घडली.

काय आहे प्रकरण
शहरातील अकबरी प्लॉटमधील काही युवकांनी पूर्ववैमनस्यातून अब्दुल सलमान अब्दुल रज्जाक याची धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच अकोट शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख संतोष महल्ले घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेचा तपास करून २ जणांना ताब्यात घेतले आहे. हि हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समजत आहे.

आरोपींनी अकबरी प्लॉटमध्ये अब्दुल सलमान याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून घटनास्थळावरून पळ काढला. हा हल्ल्यात अब्दुल सलमानचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तपास करत मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी रात्री उशिरा २ जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता अब्दुल सलमान याची हत्या पूर्ववैमनस्यातून केल्याची माहिती मिळाली आहे. पण त्याच्या हत्येमागील नेमके कारण समजलेले नाही. अकोट पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.