Budget 2021 । देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना; बजेटमध्ये ३,७६८ कोटी रुपयांची तरतूद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपातील जनगणना होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये ३,७६८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी केली.

जनगणनेची माहिती ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच जनगणनेच्या कामामध्ये मोबाईल फोनचा वापर केला जाणार आहे.

सीतारामन म्हणाल्या, या कामगिरीसाठी मी यंदाच्या अर्थसंकल्पात ३,७६८ कोटींची तरतूद केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच जाहीर केलं होतं की, २०२१ ची जनगणना ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून केली जाणार आहे. डिजिटल इंडियाला प्रमोट करण्साठी पारंपारिक पेन आणि पेपरची पद्धतीपासून दूर होण्याचा निर्णय सरकारने घेतला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like