“2021 च्या अर्थसंकल्पात जीडीपीमधील विक्रमी घसरणीचा उल्लेख देखील नाही, फक्त मालमत्ता विक्रीवरच लक्ष”- कॉंग्रेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । 2020-21 चे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर कॉंग्रेसने सोमवारी असा दावा केला आहे कि, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणात जीडीपीमधील 37 महिन्यांची विक्रमी घट आणि अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबत उल्लेख झालेला नाही. पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी ट्वीट केले की, “जीडीपीमध्ये विक्रमी 37 महिन्यांची घट असल्याचे वित्तमंत्र्यांच्या भाषणात नमूद केलेले नाही. 1991 नंतरचे हे सर्वात मोठे संकट आहे.” त्यांनी असा दावा केला की, देशाची मौल्यवान मालमत्तांची विक्री करण्याशिवाय या अर्थसंकल्पात फारसे लक्ष दिले गेलेले नाही.” ते म्हणाले की,” मुख्य म्हणजे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला चालना नका देऊ, फक्त देशातील मौल्यवान मालमत्तांची विक्री करा. ”

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सरकारने देशातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीतून आर्थिक विकासाला गती देण्यासाठी 2021-22 या आर्थिक वर्षात भांडवली खर्च 34.5 टक्क्यांनी वाढवून 5.5 लाख कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि वित्तीय संस्थांमधील हिस्सेदारी विक्रीतून आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासह कोरोना लसीकरण मोहिमेसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषण वाचतांना सांगितले की, “हे बजट आव्हानांनी परिपूर्ण अशा वातावरणात सादर केले गेले आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे अनेक लोकांनी प्राण गमावले आहे. दरम्यान, आम्ही 40 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जातील याची व्यवस्था करण्यात आली होती. सरकारने 4 आत्मनिर्भर पॅकेजेस जाहीर केली. आम्ही जीडीपीच्या 13 टक्के म्हणजे 27 लाख कोटी रुपये बाजारात ठेवले.”

नरेंद्र मोदी सरकारचे हे सातवे पूर्ण बजट आहे. गेल्या 6 अर्थसंकल्पात केंद्र सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या असून यामध्ये इन्कम टॅक्समध्ये अनेक प्रकारच्या सूट देण्यात आलेल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment