हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशामध्ये कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अशातच लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. पण सध्या लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. आता कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अमेरिरकन औषध निर्माता कंपनी असलेल्या एलि लिली अँड कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनचा भारतातील मध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या करोना रुग्णांसाठी वापर करण्याला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे.
याबाबत रॉयटर्सनं दिलेलीअधिक माहिती अशी की, ‘ लिली कंपनीच्या मोनोक्लोनल अँटिबॉडी इंजेक्शनमध्ये बॅमलॅनिविमॅब आणि इटेसेविमॅब या दोन प्रकारच्या अँटिबॉडी इंजेक्शनचं मिश्रण करून डोस तयार करण्यात आला आहे. या प्रकारच्या मोनोक्लोनल अँटिबॉडीज करोनाच्या विषाणूचा सामना करण्यासाठी शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या अँटिबॉडीजची नक्कल तयार करतात. त्यामुळे शरीराला करोनाच्या विषाणूंचा सामना करण्यासाठी मदत मिळू शकते
Eli Lilly gets Drugs Controller General of India (DCGI) emergency use approval for its monoclonal antibodies bamlanivimab 700 mg and etesevimab 1400 mg, in India for the treatment of COVID patients with moderate symptoms: Luca Visini, Managing Director, India Subcontinent, Lilly pic.twitter.com/arNU4eZhAc
— ANI (@ANI) June 1, 2021
काय आहे किंमत ?
दरम्यान, लिली कंपनीकडून जाहीर करण्यात आल्याप्रमाणे अधिकाधिक रुग्णांना करोनाचा सामना करण्यासाठी उपचार मिळावेत, यासाठी हे इंजेक्शन मोफत पुरवता येतील का, याची चाचपणी सुरू आहे. त्यासंदर्भात कंपनीकडून केंद्र सरकारसोबत बोलणी सुरू असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, “दोन्ही इंजेक्शनच्या कॉकटेल पॅकिंगमध्ये कासिरिविमॅब (Casirivimab) आणि इमडेविमॅब (Imdevimab) यांचे प्रत्येकी ६०० मिलीग्रॅमचे डोस आहेत. या प्रत्येक डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये इतकी आहे. या एका कॉकटेल पॅकिंगमधून दोन रुग्णांना डोस देता येऊ शकतील. एका कॉकटेल पॅकिंगची कमाल किंमत १ लाख १९ हजार ५०० इतकी आहे.”