हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Central Bank Of India कडून आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑगस्टपासून हे नवीन FD व्याजदर लागू करण्यात आले आहेत. यानंतर आता बँकेकडून 7 दिवस ते 555 दिवसांपर्यंतच्या FD वर 2.75% ते 5.55% व्याजदर दिला जाणार आहे.
Central Bank Of India कडून 7 ते 14 दिवसांच्या FD वर 2.75% व्याजदर दिला जाईल, तर Central Bank Of India 15 ते 30 दिवसांच्या FD वर 2.90% दराने व्याज देत राहील. 31-45 दिवसांच्या FD वर 3.00% व्याजदर मिळत राहतील आणि 46-90 दिवसांच्या FD वर 3.35% व्याजदर मिळत राहतील. आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया 91 ते 179 दिवसांच्या FD वर 3.85% व्याजदर देत राहील, मात्र 180 ते 364 दिवसांच्या FD वरील व्याजदर बँकेने 4.40% वरून 4.50% पर्यंत 10 बेस पॉइंट्सने वाढवला आहे. .
10 बेस पॉइंट्सने वाढ
याबरोबरच, 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या आणि 1 वर्षात मॅच्युर होणाऱ्या FD वरील व्याजदर Central Bank Of India ने 5.25% वरून 5.35% पर्यंत वाढवला आहे. आता 2 वर्ष आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर बँकेने 5.30% वरून 5.40% पर्यंत वाढवला आहे. तसेच 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर आता 5.40% व्याजदर दिला जाईल. 5 वर्ष आणि 10 वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या FD साठी 5.60% व्याजदर दिला जाईल.
SBI ने देखील एफडीवरील व्याजदरातही केली वाढ
SBI ने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD साठी व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहिती नुसार,13 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. SBI आता 7 दिवस ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर सामान्य लोकांसाठी 2.90% ते 5.65% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.40% ते 6.45% व्याज दर देत आहे. Central Bank Of India
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :http://www.centralbankofindia.co.in/en/interest-rates-on-deposit
हे पण वाचा :
Axis Bank ने FD वरील व्याजदरात पुन्हा केले बदल, आता किती रिटर्न मिळेल ते पहा
सुप्रीम कोर्टाच्या वकीलाकडून Aamir Khan विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल !!!
Axis Bank कडून FD व्याजदरात बदल; पहा आता किती रिटर्न मिळणार
EPFO: जर नियोक्ता तुमच्या PF खात्यात पैसे टाकत नसेल तर काय करावे ???