हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अॅक्सिस बँकेत आता अधिक व्याज मिळवण्याची संधी आहे. खासगी क्षेत्रातील या बँकेने FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ वेगवेगळ्या मुदतीच्या एफडीवर करण्यात आलीं आहे. अॅक्सिस बँकेने आपल्या मुदत ठेवींच्या दरात 0.45 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. हे नवीन व्याजदर 11 ऑगस्ट 2022 पासून लागू झाले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी व्याजदर वाढवले आहेत.. यापूर्वी 16 जुलै रोजी अॅक्सिस बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली होती.
Axis बँकेने FD मुदतीसाठी 17 ते 18 महिन्यांपर्यंत व्याजदर 45 बेस पॉईंटने वाढवला आहे. या दरवाढीनंतर नवीन दर 5.60 टक्क्यांवरून 6.05 टक्के करण्यात आले आहेत. अॅक्सिस बँकेच्या वेबसाईटनुसार, इतर एफडी टेंडर्सच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
बँक 7 दिवस ते 29 दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर 2.50% व्याजदर देत राहील. 30 दिवस ते 3 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर 3.00% व्याजदर कायम राहील. Axis Bank 3 महिने ते 6 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर 4.65% व्याजदर देत राहील. बँक 7 ते 8 महिन्यांत परिपक्व होणार्या FD वर 4.40% व्याजदर देत राहील. बँक 9 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर 4.65% व्याजदर देईल. त्याच वेळी, 9 महिन्यांपेक्षा जास्त आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणार्या FD वर 4.75% व्याजदर मिळत राहतील.
1 वर्ष ते 1 वर्ष 11 दिवसांमध्ये मॅच्युअर होणार्या FD वर 5.45% व्याजदर दिले जातील आणि 1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवसांमध्ये मॅच्युअर होणार्या FD वर बँक 5.75 व्याजदर बँकेकडून मिळेल . Axis Bank 1 वर्ष 25 दिवस ते 17 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर 5.60% व्याजदर देत राहील तर बँकेने 17 महिन्यांपासून ते 18 महिन्यांच्या मुदतीच्या FD वरील व्याजदर 5.60% वरून 6.05% केला आहे.