केंद्र सरकारकडून ज्वेलर्सना मोठा दिलासा, आता कर्जाची रक्कम सोन्याद्वारेही देता येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकारने ज्वेलर्सना मोठा दिलासा दिला आहे. ज्वेलर्सला लवकरच गोल्ड लोनची परतफेड करण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. वास्तविक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नवीन तरतूदीनंतर आता ज्वेलर्स गोल्ड लोनचा काही भाग फिजिकल गोल्ड प्रमाणे परत करू शकतात.

रिझर्व्ह बँकेने बुधवारी बँकांना ज्वेलरी निर्यातदार आणि देशांतर्गत सोन्याचे दागिने उत्पादकांना सोन्याच्या स्वरूपात गोल्ड (मेटल) लोन (GML) परतफेड करण्यास पर्याय उपलब्ध करुन देण्यास सांगितले. GML भारतीय रुपयामध्ये घेतलेल्या सोन्याच्या किंमतीच्या समान रकमेवर दिले जाते. रिझर्व्ह बँकेने आता या नियमांचा आढावा घेतला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार बँकांनी कर्जदारांना गोल्ड लोनचा एक भाग एक किलो किंवा त्याहून अधिक सोन्याच्या रूपात परत करण्याचा पर्याय द्यावा. तथापि, यासाठी काही अटी असतील.

सध्याच्या सूचनांनुसार सोन्याची आयात करण्यास अधिकृत बँक आणि गोल्ड मुद्रीकरण योजनेत भाग घेणारी अधिकृत बँक म्हणजेच GMS 2015 (Gold Monetisation Scheme) दागिने निर्यातदार आणि सोन्याचे दागिने उत्पादकांना GML देऊ शकतात.

GMS ची सुरूवात 2015 मध्ये झाली होती
हे लक्षात घेण्यासारखे आहे की गोल्ड मोनेटायझेशन योजनेंतर्गत आपण आपले सोने बँकेत जमा करू शकता. या योजनेत बँका व्याज देतात. सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली. घरे आणि ट्रस्टमध्ये ठेवलेल्या सोन्याचा अधिकाधिक उपयोग करणे हा त्यामागील हेतू आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group