हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pension Scheme : रिटायरमेंट नंतरचे आयुष्य आरामात घालवता येण्यासाठी प्रत्येकाने प्लॅनिंग करायला हवे. त्यासाठी आतापासून बचत करायला सुरुवात करणे महत्वाचे ठरेल. बहुतेक लोकं रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न कसे मिळेल याच्या चिंतेत असतात. त्यांना अशा ठिकाणी पैसे गुंतवायचे असतात जिथून त्यांना वृद्धापकाळात चांगली पेन्शन मिळू शकेल. लोकांची ही गरज लक्षात घेऊनच केंद्र सरकारने प्रधान मंत्री वय वंदना योजना सुरु केली आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न मिळू शकेल. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
हे जाणून घ्या कि, ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन 2017 मध्ये केंद्र सरकारकडून ही योजना सुरू कऱण्यात आली. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून सरकारसाठी ही योजना चालवली जाते आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमध्ये 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. चला तर मग केंद्र सरकारच्या या योजनेशी संबंधित महत्वाची माहिती जाणून घेउयात…
पेन्शन मिळवण्यासाठी 4 पर्याय उपलब्ध
या योजनेअंतर्गत अर्जदाराचे किमान प्रवेश वय 60 वर्षे आहे. तसेच या पॉलिसीची मुदत 10 वर्षे आहे. यामध्ये कमीत कमी पेन्शन 1000 रुपये प्रति महिना, 3000 रुपये तिमाही, 6000 रुपये सहामाही आणि 12000 रुपये प्रति वर्ष दिली जाते आहे. तसेच जास्तीत जास्त पेन्शन 9250 रुपये प्रति महिना आणि पेन्शन 1 लाख 11 हजार रुपये वार्षिकरित्या मिळेल. Pension Scheme
वैद्यकीय आणीबाणीमध्ये पैसे काढण्याची सुविधा
केंद्र सरकारच्या या योजनेमध्ये एकरकमी पैसे गुंतवावे लागतील. ज्यावर 7.4 टक्के दराने व्याज दिले जाईल. प्रधानमंत्री वय वंदना योजनेची खास बाब अशी कि, यामध्ये वैद्यकीय चाचणीची गरज भासत नाही. या योजनेमध्ये पती-पत्नी या दोघांनाही वयाच्या 60 व्या वर्षी प्रत्येकी 15 लाख रुपये गुंतवता येतील. तसेच जर पॉलिसीधारकाला एखादी वैद्यकीय आणीबाणी आली तर त्याला यामधील पैसे काढता येतील. अशा परिस्थितीत पॉलिसीधारकाला 98 टक्के रक्कम परत दिली जाईल. तसेच या पॉलिसीला 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यावर कर्जाची सुविधा देखील मिळेल. Pension Scheme
हे जाणून घ्या कि, या योजनेमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवले तर प्रत्येक महिन्याला 1000 रुपयांची पेन्शन मिळेल. तसेच जर 15 लाख रुपये गुंतवले तर 9250 रुपये मासिक पेन्शन मिळेल. आपल्याला ही पेन्शन त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर देखील घेता येईल. Pension Scheme
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Pension-Plans/Pradhan-Mantri-Vaya-Vandana-Yojana1
हे पण वाचा :
Bank Loan : आता ‘या’ बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन व्याजदर
SBI ने सुरू केली नवीन एफडी स्कीम, जाणून घ्या ‘या’ योजनेशी संबंधित खास गोष्टी
Penny Stocks खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे नवीन भाव
ATM Card द्वारे अशा प्रकारे मिळवा 5 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या याविषयीची अधिक माहिती