नवी दिल्ली । सरकार प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेंतर्गत देशांतर्गत सोलर सेल आणि मॉड्युल मॅन्युफॅक्चरिंगसाठी 24 हजार कोटी रुपयांपर्यंत फंड वाढवणार आहे. सध्या ही रक्कम 4,500 कोटी रुपये आहे. उर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह म्हणाले, “आम्ही सोलर सेल आणि मॉड्यूल्ससाठी 4,500 कोटी रुपयांची PLI योजना आणली आहे. आम्ही निविदा आमंत्रित केल्या आणि आम्हाला सोलर उपकरणांसाठी 54,500 मेगावॅट क्षमता मिळाली. आम्ही सरकारला या योजनेअंतर्गत आणखी 19,000 कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे. त्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. आता आमच्याकडे 24,000 कोटी रुपयांची PLI योजना आहे. आम्ही सोलर उपकरणे निर्यात करू.”
सिंग म्हणाले की,”सध्या देशात सोलर मॉड्यूल निर्मिती क्षमता 8,800 मेगावॅट आहे, तर सोलर सेलची उत्पादन क्षमता 2,500 मेगावॅट आहे.”
मंत्रिमंडळाने एप्रिलमध्ये 4500 कोटींच्या PLI योजनेला मंजुरी दिली होती
या वर्षी एप्रिलमध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाने सोलर PV मॉड्यूल्सच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 4,500 कोटी रुपयांच्या PLI योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेअंतर्गत, एकात्मिक सोलर पीव्ही मॉड्यूल्सच्या उत्पादन क्षमतेमध्ये 10,000 मेगावॅट जोडण्याचे लक्ष्य आहे. यासाठी सध्या 17,200 कोटी रुपयांची थेट गुंतवणूक करावी लागेल.
PLI योजनेंतर्गत वाटप 24,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवून, गुंतवणुकीचे प्रमाण आणि देशांतर्गत उत्पादन क्षमता आणखी वाढवली जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेली PLI योजना…राष्ट्रीय उच्च कार्यक्षमता सोलर PV मॉड्यूल्स कार्यक्रम.. उर्जेसारख्या धोरणात्मक क्षेत्रातील आयातीवरील अवलंबन कमी करण्याचा उद्देश आहे.