Central Railway : मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय!! आता 2 शिफ्टमध्ये होणार काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात. मुंबई उपनगरातून लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो आणि परत जातो. मुंबई उपनगरातील लोकांचा मुंबईत येण्याचा प्रवास आणखी सोपा व्हावा या दृष्टीने मध्य रेल्वेने (Central Railway) खाजगी कंपन्यांना व अन्य आस्थापनाला आपल्या कार्यालयीन वेळेत बदल करण्यासाठी सांगितले आहे. याची सुरुवात मध्य रेल्वेने स्वतःच्या कर्मचाऱ्यांना दोन शिफ्ट मध्ये कामाला येण्यास सांगून केली आहे. मध्य रेल्वेच्या या ऐतिहासिक निर्णयाचं सध्या स्वागत केलं जात आहे.

38 लाख प्रवासी रोज मुंबई लोकलचा करतात वापर : Central Railway

मुंबई मधील लोकलच्या माध्यमातून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. काही आकडेवाडीनुसार 38 लाख प्रवासी रोज मुंबई लोकलचा वापर करून  आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचतात. दिवसेंदिवस ही गर्दी वाढतच आहे. त्यात यामधील 83 टक्के प्रवासी सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. लोकल मधील गर्दीमुळे अपघात व प्रवाश्यांच्या वस्तू चोरी होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. लोकलची गर्दी कमी  करण्यासाठी अनेकदा कार्यालयीन वेळेत बदल करण्यात यावे असे आवाहन  लोकल प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र याची दखल फार कोणी घेताना  दिसले नाही त्यामुळे मध्य रेल्वे विभागाने (Central Railway) स्वतः कर्मचाऱ्याच्या वेळेत बदल करून आदर्श घालून दिला आहे.

खासगी कंपन्यांनी आपल्या कार्यालयीन वेळेत बदल करावा :

मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सांगितले की, लवकरच शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, पालिका अशा सर्व इतर यंत्रणांनादेखील लोकल गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत पत्र पाठवण्यात येणार आहे. तसेच खासगी कंपन्यांनी आपल्या कार्यालयीन वेळेत बदल करावा, असं आवाहन मध्य रेल्वेनं केलं आहे.

विभागीय व्यवस्थापक विभागातील 2 हजार कर्मचाऱ्यांचा शिफ्ट बदलल्या  :

मध्य रेल्वे विभागाच्या माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत स्वतः  बदल केला आहे. त्यामध्ये मुंबई विभागीय व्यवस्थापक विभागातील 2 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असून हे सर्व कर्मचारी 1 नोव्हेंबरपासून दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या सकाळी 9:30 ते सायं 5:45 आणि सकाळी 11:30 ते रात्री 7.45 अशा शिफ्ट असतील.