ऐन होळीच्या सणात रेल्वेचा मोठा निर्णय ! ‘या’ विभागाची तिकीट विक्री बंद ठेवणार

railway news holi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

होळीचा सण अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. असे असताना रेल्वे मार्गाने होळी काळात कोकणासह विविध गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढत्या गर्दीमुळे रेल्वे प्रशासनाने १६ मार्च २०२५ पर्यंत मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर फलाट तिकीट विक्री बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये काही स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. गर्दीच्या कारणामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे म्हंटले जात आहे.

कोणत्या स्थानकांवर मिळणार नाही फलाट तिकीट?

रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), ठाणे, कल्याण, पनवेल, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, नागपूर आणि पुणे या स्थानकांवर फलाट तिकीट विक्री बंद करण्यात येणार आहे.

गर्दी रोखण्यासाठी हे उपाय राबवले जाणार

सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने रेल्वे स्थानकांवरील गर्दीवर नजर ठेवली जाईल.
फक्त आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच स्थानकात प्रवेश दिला जाईल.
प्रवासाच्या दोन तास आधीच स्थानकात पोहोचण्याचे प्रवाशांना आवाहन.
रुग्ण, वयोवृद्ध, लहान मुले यांना साथ देणाऱ्या व्यक्तींना विशेष परवानगी.
प्रवाशांनी गर्दी टाळावी व स्थानकात अनावश्यक थांबू नये, यासाठी सतत सूचना दिल्या जातील.

होळी स्पेशल ट्रेनमुळे वाढलेली गर्दी

होळी आणि शिमग्याच्या निमित्ताने प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याचसोबत स्थानकांवरील अनावश्यक गर्दीवर नियंत्रण ठेवणेही अत्यंत गरजेचे ठरले आहे.

पश्चिम रेल्वेकडून स्वतंत्र नियोजन

मध्य रेल्वेने हे निर्बंध जाहीर केले असले तरी, पश्चिम रेल्वेकडून मात्र अशा प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा यंत्रणा आणि सीसीटीव्ही यंत्रणेचा कठोर बंदोबस्त ठेवण्यात येईल. त्यामुळे जर तुम्ही प्रवास करत असाल, तर या नव्या नियमांची माहिती ठेवा आणि नियोजनानुसार लवकर स्थानकात पोहोचा. प्रवास सुकर करण्यासाठी प्रशासनाचे सहकार्य करा