हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीयांच्या खिशाला परवडणारा प्रवासी पर्याय म्हणजे रेल्वे.लांबच्या पल्ल्यासाठी अतिशय परवडणारा आणि आरामदायी असा प्रवास असल्याने अनेकजण रेल्वेला प्राधान्य देतात. त्यामुळे रेल्वेचा वापर रोजच्या दिवशी हजारो लाखो लोक करतात. कोणत्याही लांबच्या ठिकाणी जायचे असल्यास आपल्या समोर रेल्वे हाच पर्याय उभा ठाकतो. त्यामुळे रेल्वेला त्याचा चांगला फायदा होतो. याचेच फळ म्हणजे मध्ये रेल्वेने (Central Railways) मागच्या सात महिन्यात तब्बल 4129 कोटींपेक्षा अधिक महसूल मिळवला आहे.
सणासुदीच्या काळात रेल्वे हा प्रवासाला साथ देणारा सर्वात महत्वाचा घटक मानला जातो. सणासुदीच्या काळात गर्दीला आळा घालण्यासाठी रेल्वेने अनेकानेक नवीन रेल्वे सुरु केल्या होत्या. त्यामुळे त्याचा फायदा हा रेल्वेला अधिक झाला. सणासुदीच्या काळात तब्बल 90.76 कोटी प्रवाश्यांनी प्रवास केल्यामुळे रेल्वेला तब्ब्ल 4129 कोटींपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. मागच्या वर्षीच्या याच काळात रेल्वेने 81 कोटी प्रवाश्यांनी प्रवास केला होता. त्यावेळी 3506 कोटी रुपये मध्य रेल्वेने (Central Railways) कमवले होते.
मध्य रेल्वेने फक्त ऑक्टोबर महिन्यात 629 कोटीं कमवले – Central Railways
विशेष गोष्ट म्हणजे फक्त ऑक्टोबर महिन्यात 13.67 कोटी प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेने 629 कोटींचा महसूल मिळवला आहे. त्यामुळे सणासुदीचा हा काळ रेल्वे साठी अत्यंत फायदेशीर गेला असं म्हणायला काही हरकत नाही. अजूनही आता नाताळ आणि नवीन वर्ष समोर असताना रेल्वेच्या महसुलात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.