Central Railways | मध्य रेल्वे फायद्यात असून प्रवासी व महसुलात वाढ झाली आहे. या वर्षी मध्य रेल्वेने प्रवासी, मालवाहतूक व विविध सेवांच्या माध्यमातून एकूण 12,489.41 कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. मध्य रेल्वेच्या प्रवासी संख्येत सुद्धा 10.46 टक्के वाढ झाली असून ही प्रवासी वाहतूक करीत असताना मध्य रेल्वेच्या तिजोरीत 4691.10 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. गत वर्षी मध्ये रेल्वेने 4077.62 कोटी रुपये महसूल मिळवला होता. नोव्हेंबर महिन्यात मध्य रेल्वेने एकुण 131.56 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करत त्यातून 595 कोटी 56 लाखांचा महसुल प्राप्त केला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर – 2022 या कालावधीत प्राप्त झालेल्या 1391.12 कोटी महसुलाच्या तुलनेत, या वर्षीच्या महसुलात तब्बल 18.71 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे दिसून आले.
2022 या वर्षात मध्य रेल्वेने 4077.62 कोटी रुपये महसूल मिळवला होता. या नोव्हेंबर महिन्यात मध्य रेल्वेने एकुण 131.56 दशलक्ष प्रवाशांची वाहतुक केली आहे. ही वाहतूक करताना मध्य रेल्वेने 595 कोटी 56 लाखांचा महसुल मिळवला आहे. मध्य रेल्वेच्या तिजोरीत गत 8 महिन्यात 12 हजार 497 कोटीचा महसूल जमा झाला आहे. यामध्ये प्रवासी वाहतुकीतून 4 हजार 699 कोटी तर मालवाहतुकीतून तब्बल 6 हजार 146 कोटीपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे.
सद्यस्थितीत मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरुन दररोज सुमारे 35 ते 36 लाख प्रवासी प्रवास करत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या 8 महिन्यात मध्य रेल्वेने एकुण 1 हजार 39 दशलक्ष प्रवासी वाहतुक केली आहे. गेल्या वर्षी मध्य रेल्वेने 940. 78 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली होती.
विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या (Central Railways) प्रवासी संख्येत 10.46 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. प्रवासी वाहतुकीदरम्यान मध्य रेल्वेने 4691.10 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. गेल्या वर्षी 4077.62 कोटी रुपये महसूल प्राप्त केला होता. नोव्हेंबर 2023 मध्ये मध्य रेल्वेने एकुण 131.56 दशलक्ष प्रवाशांची वाहतुक करत 595 कोटी 56 लाखांचा महसुल प्राप्त केला आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत वस्तू व सामानाच्या वाहतुकीतून मध्य रेल्वेने 6146.83 कोटी महसूल प्राप्त केला आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर -2022 या काळात 5380.15 कोटी मिळवला होता. गत वर्षाच्या तुलनेत विचार केला तर माल वाहतुकीतून मिळणाऱ्या महसुलात 14.22 टक्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. महत्वाची गोष्ट म्हणजे मध्य रेल्वेने नोव्हेंबर 2023 मध्ये 785.51 कोटी रुपयांचा महसूल मिळवला.
विविध माध्यमांतून प्राप्त झालेला महसूल- Central Railways
एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या दरम्यान , इतर कोचिंग, सामान, नॉन-फेअर महसूल तसेच विविध माध्यमांतून प्राप्त झालेला महसूल (विविध, पार्किंग, केटरिंग, विश्रामगृह, शौचालयाचा वापर इ.सह) रु.1651.48 कोटी प्राप्त झाला आहे. गेल्यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर – 2022 कालावधीत प्राप्त झालेल्या 1391.12 कोटी रुपये विविध माध्यमांतून उपलब्ध झाले होते. विविध माध्यमांतून प्राप्त झालेल्या गत वर्षाच्या महसुलाच्या तुलनेत 18.71 टक्क्यांची वाढ झालेली दिसत आहे.
या वर्षी मध्य रेल्वेने प्रवासी, मालवाहतूक व विविध सेवांच्या माध्यमातून एकूण 12,489.41 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केल्याचे दिसून आले आहे. तसेच गत वर्षाच्या तुलनेत विविध माध्यमांतून (विविध, पार्किंग, केटरिंग, विश्रामगृह, शौचालयाचा वापर इ.सह) मिळालेल्या महसुलात 18.71 टक्क्यांची वाढ झालेली दिसून आली. गत वर्षाच्या तुलनेत विचार केला तर माल वाहतुकीतून मिळणाऱ्या महसुलात 14.22 टक्यांची वाढ झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत प्रवासी वाहतुकीच्या महसुलात तब्बल 18.71 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या (Central Railways) प्रवासी संख्येतही 10.46 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.