Central Silk Board Vacancy 2024 | केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत ‘या’ पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु, तब्बल 122 पदांची होणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Central Silk Board Vacancy 2024 | आपल्याकडे असे अनेक सुशिक्षित तरुण आहे, ज्यांनी खूप चांगले शिक्षण घेतलेले आहे, तरी देखील त्यांना लवकर नोकरी मिळत नाही. आता त्याच तरुणांसाठी आम्ही नोकरीची एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत शास्त्रज्ञ बी यांच्या रिक्त जागा भरायच्या आहेत. त्यांच्या तब्बल 122 रिक्त जागांसाठी अधिसूचना निघालेली आहे. त्यामुळे उमेदवारांकडून आता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. आता या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव

केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत शास्त्रज्ञ बी या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

केंद्रीय देशमंडळ अंतर्गत शास्त्रज्ञ बी पदाच्या तब्बल 122 रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागा साठी अर्ज मागविण्यात आलेले आहे.

शैक्षणिक पात्रता | Central Silk Board Vacancy 2024

मास्टर डिग्री इन सायन्स किंवा मास्टर डिग्री एग्रीकल्चर सायन्स झालेली असणे खूप गरजेचे आहे.

वयोमर्यादा

शास्त्रज्ञ बी या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचे, असेल तर तुमचे वय 35 वर्षापर्यंत असणे खूप गरजेचे आहे. त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिक यासाठी अर्ज करू शकत नाही.

अर्ज पद्धती

तुम्ही केंद्रीय रेशीम मंडळाच्या या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यासाठी आम्ही अधिकृत वेबसाईट देखील देणार आहोत.

मासिक वेतन

शास्त्रज्ञ बी या पदासाठी दर महिन्याला 56 हजार 600 ते 1 लाख 77 हजार 500 एवढे वेतन तुम्हाला मिळणार आहे.

अर्ज कसा करायचा

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यासाठी करण्यापूर्वी उमेदवारांनी काळजीपूर्वक सूचना वाचणे गरजेचे आहे.
  • शेवटच्या तारखे अगोदर तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.