लोकसभा निवडणुकीमुळे CET 2024 परीक्षांच्या तारखांमध्ये बदल; आता यादिवशी होणार परीक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 19 एप्रिलपासून देशांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठीची (Lok Sabha Election) मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या दोन परीक्षांचा ही समावेश आहे. मुख्य म्हणजे, आता एलएलबी, इंजिनियरिंग, नर्सिंग आणि इतर कोर्ससाठी होणार्‍या MHT CET 2024 परीक्षेच्या तारखेत देखील बदल करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्रकडून देण्यात आली आहे.

महत्वाची बाब म्हणजे नव्या वेळापत्रकानुसार, CET 2024 परीक्षा येत्या 22 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. यात, MHT CET PCM ग्रुपची दोन मे ते 16 मे दरम्यान घेतली जाईल. यापूर्वी हीच परीक्षा 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणार होती. परंतु आता या परीक्षेच्या तारखा बदलण्यात आले आहेत. आता MAH- AAC CET ची परीक्षा 12 मे रोजी होणार आहे. तर MAH- L.L.B.5 Yrs. CET ची परीक्षा 17 मे ला घेतली जाईल. MH- Nursing CET ची परीक्षा 18 मे रोजी होईल. तसेच, MAH- B.BCA/BBA/BMS/BBM-CET ची परीक्षा 27 ते 29 मे रोजी घेतली जाईल.

दरम्यान, सर्व सीईटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दहा दिवस अगोदर ऍडमिट कार्ड देण्यात येईल. सीईटी विद्यार्थ्यांना
रजिस्ट्रेशन नंबर आणि बर्थ डेट टाकून आपले अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करता येतील. डाऊनलोड केलेल्या ऍडमिट कार्ड मध्ये जर काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी विभागाला संपर्क साधावा लागेल.