सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गो ब्राम्हण प्रतिपालक म्हटले जाते. म्हणजेच शिवाजी महाराज ब्राम्हणांचे पालक मान्य आहे, पण तानाजी मालुसरे कुणबी असतील, शिवा काशिद न्हावी असतील किंवा दलित समाजाचे पालक नव्हते का? ते फक्त ब्राम्हणांचे पालक झाले का? ब्राम्हणांनी राज्यभिषेकाला विरोध केला. मग ब्राम्हणांचेच प्रतिपालकच महाराज कसे काय झाले, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
नायगाव (ता. खंडाळा) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी छगन भुजबळ आले होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. छगन भुजबळ पुढे म्हणाले, अजित पवारांच्या विधानावर आत्ता बोलणार नाही. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यामुळे आत्ता बोलणार नाही. मी अभ्यास करतोय.
छत्रपती शिवाजी महाराज काय केवळ ब्राह्मणांचे पालक होते का? pic.twitter.com/8z4CExlJr5
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) January 3, 2023
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दिल्या जात असलेल्या गो ब्राम्हण प्रतिपालक या घोषणेवरून आता छगन भुजबळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे आता ब्राम्हण समाज आपला विरोध दर्शवू शकतो. परंतु अशा अनेक गोष्टीचा अभ्यास करण्याची गरज असल्याचेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे.
मी सगळ्या ब्राम्हणांबद्दल बोलत नाही
छगन भुजबळ म्हणाले, अनेक ब्राम्हणांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अनेकदा मदत केली आहे. छ. शिवाजी महाराजांना मदत करणारे, जिवाला जीव देणारे वेगवेगळ्या समाजातील लोक होते. मग गो ब्राम्हण प्रतिपालकच कसे काय झाले. ब्राम्हणांनी छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक विरोधही केला होता. परंतु मी सगळ्या ब्राम्हणांविषयी बोलत नाही.