सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
काय करू रडू का? राग नाही, एवढा संताप आलाय की तलवारीने एका एकाची मुंडकी छटावीशी वाटतात, असा संताप छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रायगड आक्रोश आंदोलन प्रसंगी जाताना व्यक्त केला.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रायगडला जाण्यापूर्वी जलमंदिर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून प्रवासाला सुरुवात केली. यावेळी पत्रकारांची बोलतानाच उदयनराजे यांनी राज्यकर्त्यांवर नाव न घेता संताप व्यक्त केला. मला कोणाचा फोन आला नाही, मला कोणाची परवा नाही. असं वाटतंय एका एकाची मुंडक छाटावी.
सातारा बाहेर जलमंदिरच्या परिसरात शेकडो शिवभक्त उदयनराजे यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. यातच उदयनराजे भोसले विद्यमान राज्यकर्ते व सत्ताधार्यांवर नाव न घेता चांगलेच संतापलेले दिसून आले. आता महाराज आज रायगडावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.