छ. उदयनराजेंची खंत : छ. शिवाजी महाराजांचा मुद्दा बाजूला पडला असता

Udayanaraje Bhosale
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
सीमावाद प्रश्नामुळे छ. शिवाजी महाराजांची बदनामीचा मुद्दा केव्हाच बाजूला पडला असता. परंतु उशिरा का होईना आता लोक एकत्र येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामी बाबत मुद्दा मी लावून धरला नसता, तर तो केव्हाच बाजूला पडला असता, अशी खंत छ. उदयनराजे भोसले यांनी आज सातारा येथे बोलून दाखवली.

कर्नाटक आणि महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या सीमा भागावरील प्रश्नावर छ. उदयनराजे म्हणला, भाषावार रचना होण अपेक्षित होत पण झाली नाही. सीमावादावर महाजन समिती बसवली, त्याला जमल नाही, त्यांची कुवत नव्हती किंवा त्यांची इच्छा शक्ती नव्हती. तुमच्या राजकारणामुळे सीमावर्ती भागातील लोकांची प्रगती खुंटत आहे. यामध्ये पंतप्रधानांनी मध्यस्ती करणे गरजेचे होते. कर्नाटक असो की महाराष्ट्रातील परंतु या सीमाभागातील लोकांचे नुकसान होत आहे.

लोकशाही वरचा विश्वास उडत चालला : छ. उदयनराजे
मी तर नेहमी सांगतो कायदा शिल्लक राहिला आहे का ? बलात्काराचा गुन्हा करणारे धनधांडगे पैशाच्या जोरावर वकील पोलिस खरेदी करतात त्यामुळे लोकांचा लोकशाही वरचा विश्वास उडत चालला आहे.बाहेरच्या देशात कायदे कडक आहेत आपल्या कडे सुध्दा तसे कडक कायदे करा चोरी करणाऱ्यांची बोते छाटली जातील.बलात्कार करणाऱ्यांचे काहीही छाटा एका बाजूला स्त्री ला आपण आदिशक्ती म्हणतो जपण्याचं काम तरी आपण केलं पाहिजे.