हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेनंतर आता सर्व क्रिकेटप्रेमी चाहत्यांचे लक्ष्य पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीकडे (Champions Trophy 2025) लागलं आहे. हि चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार असून याबाबतचे वेळापत्रक समोर आलं आहे. 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात असून भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. तर भारत- पाक या २ कट्टर प्रतिस्पर्धी संघात २० फेब्रुवारी रोजी रंगतदार मुकाबला बघायला मिळेल. क्रिकेटप्रेमींसाठी भारत- पाकिस्तान सामना म्हणजे एक पर्वणीच असेल. मात्र भारतीय संघ पाकिस्तानला जाणार कि याबाबत अजूनही शंका आहे.
खरं तर तब्बल सात वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आलं आहे. याआधी 2017 मध्ये ही स्पर्धा पार पडली होती. यात पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. नियमाप्रमाणे विजेत्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जातं. त्यामुळे यंदा पाकिस्तानने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. लाहोर, कराची आणि रावळपिंडीच्या स्टेडिअमवर हे सामने होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकूण आठ संघ पात्र ठरले आहेत. यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले असून त्यांच्या व्यतिरिक्त बांगलादेश आणि न्यूझीलंडचे संघ या गटात आहेत.
कधी आहेत भारताचे सामने ? Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला भारत न्यूझीलंड विरुद्ध लढेल. आमने सामने असतील. ग्रुप स्टेजमधला भारतीय संघाचा शेवटचा सामना 1 मार्चला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी असणार आहे. टीम इंडियाचे हे तीनही सामने लाहोरमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
चॅम्पियन ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक –
19 फेब्रुवारी : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान – कराची
20 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध भारत – लाहोर
21 फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका – कराची
22 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – लाहोर
23 फेब्रुवारी: न्यूझीलंड विरुद्ध भारत – लाहोर
24 फेब्रुवारी : पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश – रावळपिंडी
25 फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड – लाहोर
26 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका – रावळपिंडी
27 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड – लाहोर
28 फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया – रावळपिंडी
1 मार्च: पाकिस्तान विरुद्ध भारत – लाहोर
2 मार्च: दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड – रावळपिंडी
5 मार्च: पहिली उपांत्य फेरी – TBC विरुद्ध TBC – कराची
6 मार्च: दुसरी उपांत्य फेरी – TBC विरुद्ध TBC – रावळपिंडी
9 मार्च: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनल – TBC विरुद्ध TBC – लाहोर