हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आचार्य चाणक्य यांनी माणसाला कार्यक्षम (Chanakya Niti) जीवन जगण्यासाठी अनेक तत्वे दिली आहेत. चाणक्य हे उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ, कुशल राजकारणी आणि तत्वज्ञानी होते. त्यांनी आपल्या नितीमध्ये माणसाला योग्य आयुष्य जगण्यासाठी अनेक सल्ले दिले आहेत. आचार्य चाणकाच्या मते, एखाद्या व्यक्तीला मिळत असलेला मान- सन्मान हीच त्याने कमावलेली सर्वात मोठी गोष्ट असते. आयुष्यात कठोर परिश्रम केल्यानेच आपल्याला यश मिळते आणि त्यामुळे समाजात आपल्याला मान- सन्मान मिळतो. त्यामुळे व्यक्तीने त्याच्या मान- सन्मानाबाबत कधीही तडजोड करू नये. कोणी आपला अपमान केला आणि तुम्ही सुद्धा ते सहन करत बसला तर समाजात तुमची प्रतिमा मलीन होऊ शकते.
वास्तविक, जीवनात कधी कधी आपल्याकडून चुका होत असतात. त्यामुळे वरिष्ठांनी केलेला अपमान आपल्याला सहन करावा लागतो. परंतु आपली काहीही चूक नसताना कोणी तुमचा अपमान केला आणि तुम्ही सुद्धा सहन करत बसला तर हे एकप्रकारे विष पिल्याच्या समान मानलं जात.
चाणक्य यांच्या नीतीनुसार, जर एखादी व्यक्ती तुमचा अपमान करत असेल तर एकदा सहन करणे हे समजूतदार पणाचे लक्षण आहे. दुसर्या वेळी अपमान सहन करणे म्हणजे ही गोष्ट सदर व्यक्तीची महानता दर्शविते. परंतु जर आपल्याला तिसऱ्यांदा सुद्धा तुम्ही अपमान सहन केला तर मात्र तुम्हीच मूर्ख आहेत हे सिद्ध होत.
जगात असे बरेच लोक असतात जे सहनशील आहेत, परंतु वारंवार अपमान केल्याने आपली प्रतिमेला धक्का बसू शकतो. इतरांचा मत्सर करणारे लोक जाणूनबुजून सार्वजनिक ठिकाणी कोणाचा तरी अपमान करण्याचा प्रयत्न करतात. चाणक्य यांच्या मते, जर एखादा व्यक्ती पुन्हा पुन्हा तुमचा अपमान करत असेल तर त्याला जागीच आळा घाला कारण जर तुम्ही गप्प बसून त्याचा अपमान सहन केला तर भविष्यात त्याची हिम्मत आणखी वाढण्याची शक्यता असते आणि तो अजून तुमचा अपमान करू शकतो.