त्या लिपस्टिकवालीला काय कळतं?; चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली

Chandrakant Khaire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली आज औरंगाबादे येथे महाप्रबोधन यात्रा काढली जात आहे. या यात्रेवेळी एका सभेतील भाषणात ठाकरे गटाचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांची जीभ घसरली. त्यांनी भाषणाच्या ओघात दिपाली सय्यद यांचा उल्लेख लिपस्टिकवाली बाई असा केला. “एका लिपस्टिकवाल्या बाईने सांगितलं. सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हेंकडे काहीच नाही. त्या मीडियाशी बोलल्या,” असे चंद्रकांत खैरे यांनी म्हंटले.

औरंगाबाद येथे शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या विधानसभा मतदार संघात काल सुषमा अंधारे यांची सभा झाली. यावेळी चंद्रकात खैरे, मनिषा कायंदे, विनोद घोसाळकर आदी ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. सभेवेळी भाषण करत असताना चंद्रकांत खैरे यांनी सय्यद यांच्यावर टीका केली. एका लिपस्टिकवाल्या बाईने सांगितलं. सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हेंकडे काहीच नाही. त्या मीडियाशी बोलल्या.

अंधारे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण झालेले आहे. त्या लिपस्टिकवालीला काय समजतं? घेऊन फिरतील तिला. आता तिला पक्षात घेतही नाहीत ते. सुषमाताई असो, मनिषा कायंदे ताई असो की नीलमताई गोऱ्हे असो, या मान्यवर महिला खूप मोठ्या आहेत. आमच्याकडे अशा मान्यवर महिला आहेत. तू काही बोलू नकोस म्हटले. पावडर लावून आमच्याकडे येऊ नको. स्वत: मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या. शिवसेना नेत्या. कसल्या नेत्या? बोलण्याचा अधिकार फक्त शिवसेना नेते आणि प्रवक्त्यांना अधिकार असतो, असे त्यांनी सांगितले.