हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख माजी मंत्री म्हणून करण्यात आला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करु नका, 2-3 दिवसात कळेल, असे म्हटले होते. आता मात्र त्यांनी आपल्या विधानावरून कोलांटीउडी मारली असून मी अस बोललो च नव्हतो अस म्हंटल आहे.
इथल्या एका सलूनच्या उद्घाटनासाठी मी गेलो होतो, तिथे घोषणा सुरू होती की माजी मंत्री यांनी यांनी पुढे यावे. तर त्यावर मी म्हणालो की अरे माजी काय म्हणतो चार दिवसाने ते आजी होतील. त्यामुळे त्यात मला माजी मंत्री म्हणून नका असं काही मी म्हणालो नव्हतो. एका प्रसंगावेळी माजी मंत्री बाळा भेगडेंना उद्देशून मी म्हणालो होतो अस चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.
मला माजी मंत्री म्हणू नका असा काही विषय नाही. एवढ्या छोट्या गावातही कुणीतरी क्लिप केली आणि फिरवली. आता सामाजिक जीवनामध्ये एकदा तुमच्या नावाने बील लागलं की एकामागून एक घटना घडत असतात. आता एवढंच म्हणतो की त्यानिमित्ताने महाराष्ट्रात राजकीय चर्चा झाली. माझा कुठलाही हेतू असा नव्हता की मला माजी मंत्री म्हणू नका… असे त्यांनी म्हंटल.