Wednesday, October 5, 2022

Buy now

यंदाच्या राज्यसभेच्या निवडणुकीत एक मोठा नेता पडणार ; चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. खास करून कोल्हापूर येथील निवडणुकीतील शिवसेना व भाजपच्या उमेदवारांचा विजय हा भाजप व शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा बनला आहे. निवडणुकीत कोण जिंकणार, कोण येणार याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून अनेकवेळा भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत. अशात आज कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक विधान करत भविष्यवाणीही केली. यंदाच्या राज्यसभेच्या निवडणुकीत एक मोठा नेता पडेल आणि भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक हे 100 टक्के निवडून येतील, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपच्या वतीने कोल्हापुरातील उदभवणाऱ्या पूर प्रश्नी व त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या प्रश्नी टाहो मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाटील यांनी माध्यमांशी ससंवाद साधला. ते म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे नियोजन पक्के आहे. काहीही झाले तरी कोणत्याही परिस्थितीत आम्ही घोडेबाजार करणार नाही.

परंतू एक गोष्ट मात्र निश्चित आहे ती म्हणजे आमचे उमेदवार धनंजय महाडिक या निवडणुकीत निवडून येणार आणि मोठा नेता पडणार आहे. महाविकास आघाडीने वाटल्यास एकत्र आमच्यासोबत चर्चा करून त्यांच्यातील एक उमेदवार मागे घ्यावा. या सगळ्यांनाच झोपेत सुध्दा भाजप दिसतोय. हे खूप भांडतील. परंतू सरकार पडणार नाही. कारण सरकार पडल्यानंतर भाजपच येणार हे त्यांना माहिती आहे. परंतू सत्तेवर आल्यावर हिसाब किताब चुकता कर, असा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला आहे.