हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉंब मुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून यावरुन, विरोधकही महाविकास आघाडी सरकार आणि गृहमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला १०० कोटी हप्त्याचे टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला.
परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्वरित चौकशी करण्याची विनंती केली आहे. अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरेंकडे पत्र सोपवलं असून त्यासंबंधीचं ट्विट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.
अनिल देशमुखांकडून २१ तारखेला पत्र लिहून घेतले गेले. ते ४ दिवस प्रलंबित ठेऊन २४ तारखेला प्रसिद्ध केले.१०० कोटींच्या वसुलीचे आरोप व पत्रात व्हाट्सअँप-एसएमएसची भाषा.पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न? अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाब..नाही तर…?? pic.twitter.com/RnAO0znfNf
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 25, 2021
अनिल देशमुखांकडून २१ तारखेला पत्र लिहून घेतले गेले. ते ४ दिवस प्रलंबित ठेऊन २४ तारखेला प्रसिद्ध केले.१०० कोटींच्या वसुलीचे आरोप व पत्रात व्हाट्सअँप- एसएमएसची भाषा. पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न? अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव…नाही तर…??” अस ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले.
दरम्यान यापूर्वीच अनिल देशमुख यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्वरित चौकशी करण्याची विनंती केली आहे. अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात आलेल्या पत्राचा फोटोही ट्विटमध्ये जोडला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा