मुंबई | विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते अस्वस्थ झालेले आहेत. त्यामुळे सभागृह चालून न देणे एवढंच त्यांच्या हातामधे आहे असं म्हणत भाजपा नेते आणि सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधी पक्षीयांवर निशाना साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याचसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत असं म्हणत पाटील यांनी विरोधकावर आरोप लगावला. हिवाळी अधिवेशना दरम्यान पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘मराठा आरक्षणा संदर्भात आज पर्यंत अनेक आयोग आले. परंतू मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस कोणीच केली नाही. मागास आयोगाने गेल्या ७० वर्षांत पहिल्यांदाच मराठा समाज मागास असल्याचं म्हटलं आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस केली’ असे मत पाटील यांनी मांडले.
मात्र आता विरोधी पक्षीयांना मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही. आणि म्हणून ते आरक्षण द्यायचं असेल तर आत्ताच द्या अशी घाईगडबड करत आहेत. मागास आयोगाने केलेल्या शिफारशी आमच्या सरकारने स्विकारल्या आहेत. आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. आणि ते आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं असावं जेणेकरुन ते कायम टिकणारं असेल असा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे असेही पाटील म्हणाले.