हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकारला शह देण्यासाठी मनसे- भाजप युतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता मनसेसोबतच्या युतीसाठी केंद्राची परवानगी लागेल अस मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे हे मला आवडणारं राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. ते बरं बोलत नाहीत तर खरं बोलतात. तसेच मनसेसोबत च्या युतीमुळे देशाच्या राजकारणावर पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे युतीबाबत केंद्रातील आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडली.
राज ठाकरेंच्या परप्रांतीय लोकांच्या भूमिकेबद्दलची क्लिप मी ऐकली आहे. माझ्या मनात काही शंका आहेत. त्याबाबत येत्या 2 दिवसांत मी राज ठाकरेंना भेटणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. युतीबाबतचा मी एकटा निर्णय घेणार नाही. आमची पार्टी या संदर्भात निर्णय घेणार आहे असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.