मुस्लिम समाजाला आरक्षण मिळत नाही हा तर विरोधकांचा कांगावा – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil
Chandrakant Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | मराठा आरक्षण मुद्दा ऐरणीवर असताना मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणार नाही असा सूर विरोधकांचा असून तो केवळ कांगावा आहे असं चंद्रकात पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

मुस्लिम समाजात बागवान , खाटीक, तांबोळी अशा अनेक ४२ जाती असून त्यांना आज मिळत आहे परंतु अजून काही आरक्षणापासून वंचित जातींचा अभ्यास करून आम्ही त्या जातींना ओबीसी प्रवर्गात टाकणार आहोत. तसेच मुस्लिमाना आरक्षण मिळणार नाही ही अफवा विरोधक पसरवत आहेत असं म्हणत पाटील यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतले.

मराठा आणि इतर आरक्षणा संदर्भात कायदेशीर चौकटीत बसेल आणि कायमस्वरुपी टिकेल असे आरक्षण आम्ही मराठा, धनगर , लिंगायत समाजाला देणार असल्याचहि त्यांनी या वेळी स्पष्ठ केलं.