Chandrayaan 3 | मागील वर्षीच म्हणजे 2023 मध्ये भारताचे मिशन चंद्रयान 3 यशस्वी झाले. याआधी दोन वेळा हे मिशन अयशस्वी झालेले आहे. अशातच आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान 3 ला दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँड करत एक मोठा इतिहास निर्माण केलेला होता. दक्षिण ध्रुवावर पोचणाऱ्या भारत हा पहिला देश ठरलेला आहे. अशातच आता चंद्रयान 3 संदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे. ज्यामुळे आता संशोधकांना चंद्र जवळून समजून घेण्यास मोठी मदत होणार आहे. Chandrayaan 3 | चंद्रयान-३ मिशनला मोठं यश; प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या निर्मितीबाबत केलं महत्वाचे संशोधन प्रज्ञान (Chandrayaan 3) रोवरने शिवशक्ती प्वाईंटजवळ एक संशोधन केलेले आहे. हे संशोधन चंद्राची निर्मिती तेथील दगड जमीन यांसंदर्भातील आहे.
चंद्रावर मिळाले खडकांचे तुकडे | Chandrayaan 3
चंद्रयान 3 चा विक्रम लँडमध्ये असणाऱ्या प्रग्यान रोवरने चंद्राच्या पृष्ठभागावरील जवळपास 103 किलोमीटर अंतर पूर्ण केलेले आहे. आता या भागामध्ये नक्की काय असणार आहे? याचे कुतूहल सगळ्या वैज्ञानिकांना आहे. चंद्रयान 3 चंद्रावरच्या ठिकाणी लॅंड झाले. त्या ठिकाणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिव प्वाइंट असे नाव दिलेले आहे. या ठिकाणी अनेक लहान खडकांचे तुकडे सापडलेले आहे. ज्याची लांबी ही 1 सेंटीमीटर ते 11.5 सेंटीमीटर एवढी आहे. तसेच एकाही खडकाची व्यास ही 2 मीटरपेक्षा जास्त नाही.
प्रज्ञान शिवशक्ती प्वाइंटच्या पुढे वाटचाल
चंद्रयान 3 च्या संशोधनात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. हे प्रज्ञान शिवशक्ती प्वाइंटच्या जवळपास 39 मीटर पुढे गेलेले आहे. त्या ठिकाणी त्याला खडक मिळालेला आहे. त्याचा आकार देखील आधीच्या खडकांपेक्षा मोठा आहे. तसेच या शिवशक्ती प्वाइंट पश्चिमेला दहा मीटर व्यासाचा एक खड्डा देखील आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या भागात खडकांचे पुनर्वितरण झालेले असेल, असा देखील अंदाज लावला जात आहे.
इस्रोकडून एका नवीन मोहिमेला सुरुवात | Chandrayaan 3
इस्रोचे चंद्रयान 3 यशस्वीपणे पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आता इस्रो आता एका नवीन मोहिमेला सुरुवात करत आहे. याबाबतची माहिती इस्रोचे प्रमुख एस स्वामीनाथ यांनी सांगितलेले आहे. भारत आता चंद्रयान (Chandrayaan 3) मिशन 4 ची अंतिम योजना तयार केलेली आहे. परंतु आता ही योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.