: शिवसेना उप तालुकाप्रमुख सुनील खजिनदार यांच्या मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते आणि माजी खासऔरंगाबाद दार चंद्रकांत खैरे तसेच पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी चंद्रकांत खैरेंचा आवाज चढला, त्यावर राजश्री आडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.
सुनील खजिनदार यांनी प्रेयसीच्या घरात आत्महत्या केली होती. आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर हजारोंचा जमाव पोलीस ठाण्यात जमला होता. यावेळी चंद्रकांत खैरे यांनीही पोलीस निरीक्षकांवर ओरडण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनीही खैरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. शिवसेनेचे औरंगाबाद उपतालुका प्रमुख आणि दौलताबाद ग्रामपंचायत सदस्य सुनील खजिनदार यांनी प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी समोर आली होती. मात्र खजिनदार यांच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
सुनील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयातून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. सुनील खजिनदार यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत रुग्णवाहिकेतून मृतदेह पोलीस ठाण्यात आणला होता. यासाठी शेकडोंच्या जमावाने दौलताबाद पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. या घटनेमुळे दौलताबादेत तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावातील दुकाने, बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group