हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chandu Champion Trailer) बॉलिवूड सिनेविश्वातील लाडका अभिनेता कार्तिक आर्यन त्याचा आगामी चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’मूळे बराच चर्चेत आहे. एका वेगळ्या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षकही त्याच्या या नव्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ‘चंदू चॅम्पियन’ या सिनेमाच्या पोस्टरनंतर आता ट्रेलर रिलीज झाला आहे. जो पाहून प्रेक्षकांची चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता आणखीच वाढली आहे. या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यनने साकारलेल्या भूमिकेची झलक दिसली आहे. त्याचा अभिनय सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतो आहे.
‘चंदू चॅम्पियन’चा जबरदस्त ट्रेलर (Chandu Champion Trailer)
गेल्या अनेक दिवसांपासून ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट चर्चेत होता. या चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अशातच नुकताच ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर हा ट्रेलर प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळवताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये १९६५ च्या हल्ल्यात चंदूला ९ गोळ्या लागून तो कोमात गेल्याचे दाखवले आहे.
त्यानंतर चंदूचं बालपण, तारुण्य आणि चॅम्पियन होण्याची जिद्द पहायला मिळते. लहानपणी चंदू चॅम्पियन म्हणून गावभर त्याची मजा घेतली जाते. मात्र, अशा संघर्षाचा सामना करून चंदू खरोखर चॅम्पियन होतो. चंदूचा गोल्ड मेडलिस्ट ते आर्मी ऑफिसरपर्यंतचा पूर्ण प्रवास या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहे’.
कधी रिलीज होणार?
‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट साजिद नाडियाडवाला आणि कबीर खान यांनी दिग्दर्शित केला आहे. (Chandu Champion Trailer) माहितीनुसार, हा सिनेमा येत्या १४ जून २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे. ते भारतातील पहिले पैरालंपिक गोल्ड मेडलिस्ट आहेत. हा चित्रपट त्यांच्याच प्रेरणादायी प्रवासावर आधारलेला आहे.
कोण आहेत मुरलीकांत पेटकर?
एकीकडे ‘चंदू चॅम्पियन’च्या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यनच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ट्रेलरमध्ये अॅक्शन, इमोशन्स, वॉर, सीक्वेंस सगळं काही आहे. यासह एका व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास दाखवण्यात आला आहे. ती व्यक्ती म्हणजे मुरलीकांत पेटकर. (Chandu Champion Trailer) भारतातील पहिले पैरालंपिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांनी ५० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग स्पर्धेत ३७.३३ सेकंद असा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. पेटकर यांना पद्मश्री या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बॉक्सिंगसोबत स्विमिंग आणि टेबल टेनिस सारख्या खेळांमध्ये देखील त्यांची विशेष रुची होती.