Voter ID मधील घराचा पत्ता कसा बदलावा हे समजून घ्या

Voter ID
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Voter ID : ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड सोबत अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून मतदार कार्ड देखील वापरता येते. आधार कार्डच्या आधी एखाद्या व्यक्तीच्या ओळखीचा सर्वात विश्वासार्ह पुरावा म्हणून मतदार कार्ड मानले जात. आताही जिथे आधार कार्ड बरोबरच दोन ओळखपत्रे आवश्यक असतात तिथे मतदार कार्ड वापरले जाते.

Distribution of voter's ID card in Noida to start from March 16 - Hindustan  Times

यामुळेच आपले मतदार कार्ड नेहमीच अपडेट असणे महत्वाचे आहे. जर आपल्या राहण्याचे ठिकाण बदलले असेल तर मतदार ओळखपत्रातील पत्ता देखील बदलणे जरुरीचे आहे. आता मतदार कार्ड मधील पत्ता आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने बदलता येतो. ऑफलाइन पद्धतीने आपला पत्ता अपडेट करण्यासाठी आपल्या मतदारसंघातील बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) कडे जावे लागेल. BLO कडे फॉर्म बरोबर आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यानंतर आपला पत्ता बदलला जाईल. Voter ID

Get corrections done in your voter ID cards every Sunday from June 3 | Navi  Mumbai News - Times of India

अशा प्रकारे ऑनलाइन पद्धतीने आपला पत्ता बदला

नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल http://www.nvsp.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
येथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावी लागेल. यासाठी, ‘Don’t Have an account Register As a new user’ वर क्लिक करून आपले रजिस्ट्रेशन करा. आधीच रजिस्टर्ड केलेले असल्यास, युझर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
जर आपण नवीन मतदारसंघात गेला असाल तर “फॉर्म 6” वर क्लिक करा.
जर घराचा पत्ता बदलला असेल मात्र घर त्याच मतदारसंघात असेल तर फॉर्म 8A वर क्लिक करा.
आता समोर उघडलेल्या फॉर्ममध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, राज्य, मतदारसंघ, सध्याचा कायमचा पत्ता भरा.

How to download voter ID or voter list for Lok Sabha election | Zee Business
यामध्ये ईमेल एड्रेस आणि मोबाइल नंबर यासारखे पर्यायी डिटेल्स देखील भरता येतील. Voter ID
यानंतर आपली सर्व कागदपत्रे जसे की फोटो, रहिवासी पुरावा आणि मार्कशीट अपलोड करावी लागेल.
सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
ही स्टेप पूर्ण केल्यानंतर, डिक्लेरेशन पर्यायावर क्लिक करून कॅप्चा भरा.
आता सर्व डिटेल्‍स काळजीपूर्वक तपासा आणि सबमिट टॅबवर क्लिक करा.
काही दिवसांनी, पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्या मतदार ओळखपत्रामधील पत्ता बदलला जाईल. याबाबतची माहिती मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर दिली जाईल. Voter ID

हे पण वाचा :

PM Kisan च्या 11 वा हफ्त्याचे पैसे मिळवण्यासाठी ‘या’ नंबर करा तक्रार !!!

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिला 960 टक्के रिटर्न !!!

LPG price : सिक्योरिटी डिपॉझिट्समध्ये वाढ झाल्याने कमर्शिअल LPG कनेक्शन महागले !!!

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ, नवीन दर तपासा

Personal Finance : आर्थिक व्यवहारांशी संबंधित ‘या’ नियमांमध्ये 1जुलैपासून होणार बदल !!!