‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिला 960 टक्के रिटर्न !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे देशांतर्गत शेअर बाजारात सध्य चढ-उतार सुरू आहेत. यादरम्यानच एका शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 1 वर्षात 950 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न दिला आहे. तसेच 2022 मध्ये देखील या शेअरमध्ये 380 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या शेअरचे नाव Gensol Engineering आहे.

Gensol Engineering Ltd reports jump in Q3 revenue | EquityBulls

गेल्या वर्षभरात हा शेअर्स 54 रुपयांवरून ते 579 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना एकूण 958 टक्के नफा मिळाला आहे. हे लक्षात घ्या कि, यादरम्यान सेन्सेक्स फक्त 0.81 टक्क्यांनी वाढला आहे तर या शेअर्सने 579 रुपयांची 52 आठवड्यांची सर्वोत्तम पातळी देखील गाठली आहे. 3 जानेवारी 2022 रोजी हा शेअर 119 रुपयांवर ट्रेड करत होता. विशेष म्हणजे या काळात सेन्सेक्स 10 टक्क्यांहून अधिकने घसरला आहे. Multibagger Stock

Gensol Solar Group - Solar Power Plant Design, Advisory, EPC

गेल्या वर्षी 28 डिसेंबर रोजी 68 रुपयांवर ट्रेड करत असलेल्या या शेअरने गुंतवणूकदारांना 746 टक्के रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 1 महिन्यात, यामध्ये 63 टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूणच काय कि या शेअर्सने सेन्सेक्सला सातत्याने मागे टाकले आहे. जर एखाद्याने ऑगस्ट 2021 मध्ये या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला आता 11 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळतील. याशिवाय, जर एखाद्याने गेल्या 6 महिन्यांत यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला 10 लाखांपेक्षा जास्त पैसे मिळतील. Multibagger Stock

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

Gensol विषयी सांगायचे झाल्यास 2012 मध्ये स्थापना झालेली ही कंपनी भारत आणि परदेशातील सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी इंटीग्रेशन आणि ऍडव्हायझरी सर्व्हिस देते. कंपनीकडे सोलर प्रोजेक्ट इंजीनिअरिंग, प्रोक्योरमेंट आणि कंस्ट्रक्शन कौशल्य आहे. कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात 153 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या 4 वर्षात कंपनीने नफ्यात 200 टक्के वाढ नोंदवली आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.gensol.in/

हे पण वाचा :

LPG price : सिक्योरिटी डिपॉझिट्समध्ये वाढ झाल्याने कमर्शिअल LPG कनेक्शन महागले !!!

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ, नवीन दर तपासा

FD-RD अन् PPF वरील व्याजावर Tax द्यावा लागेल का ???

Eoin Morgan : इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार लवकरच घेणार निवृत्ती !!!

FD Rates : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीनदर तपासा

Leave a Comment