हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारने (Central Government) पहिलीतील प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या वयात मोठे बदल केले आहेत. आता पहिलीच्या प्रवेशासाठी (Admission Age) सर्व मुलाचे वय 6 वर्षे असावे लागणार आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या संबंधित निर्देश जारी केले आहेत. सध्या केंद्र सरकार शिक्षण धोरणांच्या नियमात मोठे बदल करताना दिसत आहे. यापूर्वीच केंद्राने पहिली ते चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिलीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय 6 वय असावे, असा नियम केंद्राने आणला आहे.
शिक्षण मंत्रालयाकडून पाठवण्यात आलेल्या पत्रकात पहिली शिक्षण घेण्याची वयोमर्यादा 6 वर्ष इतकी असावी असे आदेश देण्यात आले आहेत. ही वयोमर्यादा NEP 2020 अंतर्गत प्रस्तावित आहे. यावर गेल्यावर्षीच चर्चा करण्यात आली होती. तेव्हा देखील असेच पत्र सर्व शाळांना पाठवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सरकारने याची आठवण शाळांना करून दिली आहे. त्यामुळे आता सहा वर्षाखालील मुलांना पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेता येणार नाही.
खरे तर, प्रत्येक राज्यामध्ये पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुलांच्या वयोमर्यादेत बदल आहेत. काही राज्यांमध्ये तर वयोमर्यादा पाच वर्ष असलेल्या मुलांनाच शाळांमध्ये ऍडमिशन देण्यात येते. मात्र असे केल्यामुळे त्या मुलांवर अभ्यासाचा जास्त भार येत असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रामध्ये गावपातळीच्या भागांमध्ये तर पहिलीच्या वर्गात असे अनेक विद्यार्थी शिकत आहेत ज्यांची वयोमर्यादा पाच वर्षांपेक्षा देखील कमी आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर आळा बसावा त्यामुळे सरकारने हे आदेश जारी केले आहेत. सरकारच्या या आदेशामुळे पालकांना मुलाचे वयवर्ष 6 वर्ष झाल्यानंतरच त्याला शाळेत घालावे लागणार आहे.