औरंगाबाद । पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. चालू महिन्यात 25 एप्रिलला होणारी परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्यात आली असून परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकाप्रमाणे 23 मे रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असून 10 एप्रिल पर्यंत परीक्षेसाठी अर्ज भरता येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
राज्य परीक्षा परिषदेने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 मार्च पासून सुरु आहे. त्या प्रक्रियेस मुदतवाढ देत परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेतर्फे शिष्यवृत्तीसह पाचवी स्तरावर शासकीय विद्यानिकेतन प्रवेश प्रक्रिया आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा तसेच विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा 25 एप्रिल रोजी एकाच वेळी घेण्यात येणार होती. आता 23 मे रोजी ही परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou