अमरावती प्रतिनिधी | महाराष्ट्रातील नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल येणार आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी चिखलदरा येथे राहण्याला पसंती दर्शवली आहे. त्यानुसार तेथे सोयी सुविधा असायला पाहिजे यासाठी मात्र आता प्रशासन मोठ्या शिताफीने कामाला लागलेले आहे. राज्यपाल आता मेळघाटमध्ये येणार असल्याने कोणताही उणिवा राहू नये. यासाठी स्थानिक प्रशासनाने सर्व बाबींवर लक्ष ठेवत राज्यपालांना सर्व ऑल इज वेल दिसावं याकरिता कंबर कसलेली आहे.
संपूर्ण देशभरात डिजिटल इंडियाच्या माध्यमातून नावाजलेल्या मेळघाटातील डिजिटल गाव हरीसाल… राज ठाकरे यांनी मेळघाट दौरा केल्यानंतर तेथील पितळ उघळे केले होते. सद्या राज्यपालांचा मेळघाट दौरा राहणार असल्याने हरिसालमध्ये प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. येथील पर्यटक संकुलामध्ये इतमामाची तयारी सुरू झाली आहे. हरीसालला डिजिटल दाखविण्यात आले असल्यामुळे ते फोल ठरू नये याकरिता प्रशासन कामाला लागले आहे. .
त्याकरिता प्रत्येक क्षेत्राची साफसफाई डागडूजी प्रशासन सर्वतोपरी करण्यासाठी तयार झाले आहे . हेलिपॅड ठीकाणाची व्यवस्था याकडे सुद्धा प्रशासनाने बारीक लक्ष ठेवले आहे . मात्र हिवाळी अधिवेशनाच्या वेळी स्वतः राज्यपाल जेव्हा मेळघाटातील अतिदुर्गम गाव व आताचे डिजिटल गाव असणाऱ्या हरिसाल मध्ये पाठवतील किंवा त्यांना काय जाणवते हे तर येणारा काळचं ठरवेल .