Thursday, February 2, 2023

बीड बायपास रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा;महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

- Advertisement -

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद शहरातील बीडबायपास परिसरात असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमानावर आज हातोडा फिरविण्यात आला. महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. यावेळी रस्त्यावर असलेल्या इमारती पाडण्यात आल्या.

दरम्यान मागील अनेक वर्षांपासून या परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर होता. ही अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालीकेने अनेक वेळा नोटीसा पाठवल्या होत्या. मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे आज अखेर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बीड बायपास रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

या अतिक्रमणामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच या अतिक्रमणामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे हे अतिक्रमण हटवणं गरजेचं होत. मनपातील शिवसेना-भाजप युती तुटताच या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आली आहेत  यामुळे अनेक चर्चेना उधाण आले आहे.