हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Charger : सध्याच्या काळात फोन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ज्यामुळेच तो कधीही डिस्चार्ज होऊ नये असे आपल्याला वाटत असते. कारण आपला फोन डिस्चार्ज होण्याने आपली अनेक कामे थांबतात. असे बऱ्याचदा घडते कि, आपल्या दिवसभरातील कामांमुळे आपल्याला फोन चार्जिंग करायला वेळच मिळत नाही. ज्यामुळे मग नंतर आपण तो रात्रभर चार्जिंगला ठेवतो. मात्र फोन असा रात्रभर चार्जिंगला ठेवण्याने त्याच्या बॅटरीवर काय परिणाम होतो याचा आपण कधी विचार केला आहे का ??? नसेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. चला तर मग त्याविषयीची माहिती जाणून घेऊयात…
हे ध्यानात घ्या कि, सध्याच्या काळातील स्मार्टफोन हे ओव्हरलोड होत नाहीत. कारण यासाठी एक अतिरिक्त प्रोटेक्शन चिप दिली जाते. जी आपला फोन ओव्हरलोड होऊ देत नाहीत. या अंतर्गत लिथियम-आयन बॅटरी आपल्या क्षमतेच्या 100% पर्यंत पोहोचली की त्याचे चार्जिंग आपोआप थांबवले जाते. Charger
आपला स्मार्टफोन सतत पूर्ण चार्ज करणे आपल्या बॅटरी लाईफसाठी चांगले नाही. फोन ओव्हरचार्ज करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. तसेच आपला डिव्हाइस पूर्ण भरल्यावर त्याचे चार्जिंग थांबवण्यासाठी पुरेसा स्मार्ट आहे. यामुळे तो 100 टक्के राहण्यासाठी आवश्यकतेनुसारच चार्ज करावा.
तसेच जर आपला स्मार्टफोन रात्रभर प्लग इन करून ठेवला तर प्रत्येक वेळी बॅटरी 99% पर्यंत कमी झाल्यावर तो सतत थोडी थोडी ऊर्जा वापरेल. यामुळे आपल्या फोनच्या बॅटरी लाइफवर परिणाम होईल. म्हणजेच, आपल्या फोनची बॅटरी 100% चार्ज झाल्यानंतर आधुनिक स्मार्टफोन तो चार्ज करणे थांबवतात. Charger
मात्र जेव्हा बॅटरी जास्त गरम होते तेव्हा समस्या निर्माण होते. कारण यामुळे आपल्या फोनचे नुकसान होऊ शकते. जर आपला फोन रात्रभर चार्ज करत असताना गरम होण्यापासून वाचवायचा असेल तर त्यावरील केस काढून टाकणे चांगले होईल. कारण फोनला सपाट, कडक पृष्ठभागावर ठेवण्याने त्यामधील उष्णता अगदी सहजपणे कमी होईल. Charger
अशा प्रकारे आपला फोन रात्रभर चार्ज केला तरीही तो फारसा गरम होणार नाही. याशिवाय, आजकाल आपले फोन इतक्या वेगाने चार्ज करता येतात की यासाठी आपल्याला 7-8 तास चार्ज करण्याची गरज भासत नाही. Charger
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/mobile-accessories/mobile-chargers/pr?sid=tyy%2C4mr%2Ctp2
हे पण वाचा :
No-Cost EMI ची ऑफर पडू शकते महागात, ‘या’ छुप्या शुल्कांमुळे होऊ शकेल मोठे नुकसान
Stock Market मधील अप्पर सर्किट अन् लोअर सर्किट काय असते ??? तपासा याचे नियम
Axis Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली पुन्हा वाढ
Bank Holiday : मार्चमध्ये 12 दिवस बँका राहणार बंद, घर सोडण्यापूर्वी तपासा सुट्ट्यांची लिस्ट
SBI खातेधारकांनी पॅन नंबर अपडेट केला नाही तर YONO खाते बंद होणार, तपासा ‘या’ मेसेज मागील सत्यता