औरंगाबाद – शहरांचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. स्मार्ट सिटीसाठी पाच इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या आहेत. महापालिका पदाधिकाऱ्यांसाठी लवकरच इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली जाणार आहेत. यापुढे गृहनिर्माण संस्थांना बांधकाम परवानगी देताना चार्जिंग स्टेशनची सोय बंधनकारक केली जाणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार असल्याने महापालिकेने शहरात 200 चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरांचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. त्यात स्वच्छ ऊर्जेचा वापर व्हावा यासाठी चालना दिली जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाहनांचा वापर कमी करून इलेक्ट्रिक व सौरऊर्जेचा वापर वाढावा यासाठी केंद्र व राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका, स्मार्ट सिटीसाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार स्मार्ट सिटीसाठी पाच कार खरेदी केल्यानंतर महापालिका पदाधिकाऱ्यांसाठी देखील इलेक्ट्रिक कार खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कार खरेदीकडे नागरिकांचा कलदेखील वाढला आहे. त्यामुळे शहरात 200 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासोबतच हौसिंग सोसायटीमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन करणे बंधनकारक राहील, असा निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
दोन दिवसांत होणार कारवाई पूर्ण –
महापालिकेच्या नगररचना विभागाकडून शहरातील बांधकाम व्यावसायिक परवानगी घेऊन बांधकाम करतात. त्यांना आता इमारती बांधताना चार्जिंग स्टेशनचादेखील समावेश करावा लागेल. महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक ए. बी. देशमुख यांनी सांगितले