पुणे | कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त छात्रभारती आयोजित शिक्षण-रोजगार हक्क व डी.बी.टी विरोधी परिषद साने गुरुजी स्मारक, पुणे येथे पार पडली. परिषदेची सुरवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमापुजनानंतर संविधानाच्या प्रास्ताविकाने करण्यात आली. यावेळी छात्रभारती, राष्ट्र सेवा दल तसेच समातावादी संघटनांतर्फे लवकरच शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर ११ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर ‘फुलेवाडा ते मुंबई मंत्रालय’ असा पायी लाँगमार्च काढण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली.
या परिषदेत शिक्षण-रोजगार तसेच डी.बी.टी. योजनेच्या अनुषंघाने जेष्ठ मार्गदशकांबरोबर विद्यार्थी वक्त्यांनी अभ्यासपुर्ण भाषणे केली. मदन पथवे यांनी डी.बी.टी योजनेबद्दल अभ्यासपूर्ण मांडणी करुन सरकार दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपल्या भाषणामधून पटवुन दिले. तर वचिष्ट बढे यांनी बेराजगारीच भयाण विदारक चित्र मांडल. शिक्षणाच खाजगीकरण-बाजारीकरण करुन सरकारी शिक्षण संपवण्याचा सरकारचा डाव आहे. तसेच लाखो पदे रिक्त असतांना देखील ती भरली जात नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न देखील गंभीर होत आहे. अशावेळी सर्व विदयार्थ्यांनी तसेच समविचारी संघटनांनी एकत्र येवुन न्याय हक्कांच्या मागण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची गरज आहे. असा सुर शर्मिला येवले, निलेश निंबाळकर यांच्या भाषणामधुन उमटला.
यावेळी विचारपीठावर अल्लाउद्दीन शेख, प्रा.सुभाष वारे,प्रमोद दिवेकर, उपेंद्र टण्णु, विनय सावंत सारंग पुणेकर, मदन पथवे,शर्मिला येवले, निलेश निंबाळकर ,वचिष्ट बढे होते तर कार्यक्रमाची सांगता डॉ.शरद जावडेकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकश लाटे यांनी केले तर योगेश वाघ यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी संदिप आखाडे, तुकाराम डोईफोडे, समृद्धी जाधव, लिंग्गाम्मा, रशीद मणियार, सुरज दाभाडे, लोकश लाटे, योगेश वाघ यांनी प्रयत्न केले.