उन्हाळ्यात पर्यटनाचा आनंद ! स्वस्त, मस्त, गारेगार पुणे टूर! पीएमपीकडून विशेष बससेवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे शहरात फिरण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक खास आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे. शहरातील आणि आसपासच्या पर्यटनस्थळांची माहिती न असलेल्यांसाठी आता पीएमपीने विशेष बससेवा सुरू केली आहे. गाईडसह सुरू होणाऱ्या या बससेवेच्या माध्यमातून पुणेकरांना आणि पर्यटकांना शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांची सफर अनुभवता येणार आहे.

पीएमपीकडून विशेष बससेवा

पीएमपीने विकेंड आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी १० विशेष बसगाड्यांची व्यवस्था केली आहे, जी पुणे शहरातील विविध आकर्षक स्थळांवर फिरवेल. प्रत्येक बसमध्ये गाईड देखील असणार आहे, जो प्रवाशांना स्थानिक इतिहास आणि महत्त्वाबद्दल माहिती देईल. स्मार्ट वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवास करण्याचा अनुभव वेगळाच असेल. प्रत्येक बससेवेचा तिकीट दर ५०० रुपये आहे, आणि बस सेवेचा फायदा संपूर्ण कुटुंब किंवा मित्रगटाला मिळवता येईल.

बुकिंगची सोय आणि सवलत

या विशेष पर्यटन बससाठी बुकिंगची सोय पुणे शहरातील प्रमुख ठिकाणांवर उपलब्ध आहे, जसे की डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी, आणि मनपा भवन. ग्रुप बुकिंग करतांना ३३ प्रवाशांच्या गटासाठी विशेष सवलत दिली जात आहे, ज्यामध्ये पाच प्रवाशांच्या तिकिटावर १००% सवलत मिळते. बुकिंगची वेळ सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत आहे.

पर्यटन मार्ग आणि ठिकाणे

हडपसर – स्वारगेट – इस्कॉन मंदिर – कोंढवा – श्रीक्षेत्र कानिफनाथ गड – मोरगाव गणपती दर्शन – जेजुरीदर्शन – सासवड
हडपसर – स्वारगेट – सासवड – सोपानकाका मंदिर – संगमेश्वर मंदिर – नारायणपूर एकमुखी दत्त मंदिर – नारायणेश्वर मंदिर – श्रीक्षेत्र म्हस्कोबा मंदिर – कोडीत
पुणे स्टेशन – डेक्कन जिमखाना – स्वारगेट – शिवसृष्टी – आंबेगाव – स्वामी नारायण मंदिर – नव्हे – कोंढणपूर – तुकाईमाता मंदिर – बनेश्वर मंदिर – अभयअरण्य
पुणे स्टेशन – डेक्कन जिमखाना – पु. ल. देशपांडे गार्डन – खारावडे म्हसोबा देवस्थान – निळकंठेश्वर पायथा – झपुर्झा संग्रहालय
पुणे स्टेशन – डेक्कन जिमखाना – सिंहगड रोड – खडकवासला धरण – सिंहगड पायथा – गोकूळ फ्लॉवर पार्क – गोळेवाडी – पानशेत धरण
पुणे स्टेशन – स्वारगेट – हडपसर – रामदा – थेऊर गणपती – प्रयागधाम
पुणे स्टेशन – स्वारगेट – वाघेश्वर मंदिर वाघोली – वाडेबोल्हाई मंदिर – तुळापूर – त्रिवेणी संगम – छत्रपती संभाजी महाराज समाधी वढू बु.
पुणे स्टेशन – स्वारगेट – इस्कॉन मंदिर – रावेत – मोरया गोसावी मंदिर चिंचवड – प्रतिशिर्डी – शिरगाव – देहूगाव गाथा मंदिर
स्वारगेट – पौडगाव – सत्य साईबाबा महाराज आश्रम हाडशी – चिन्मय विभूती योगसाधना ध्यान केंद्र – कोळवण
स्वारगेट – भोसरी – चाकण – कांतिवीर हुतात्मा राजगुरू स्मारक – सिद्धेश्वर मंदिर – राजगुरुनगर श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर निमगाव

तुम्ही पुणे शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळे अनुभवण्याची इच्छा व्यक्त करत असाल, तर पीएमपीच्या या विशेष बससेवेचा उपयोग करून, तुम्ही आरामदायक आणि सूगम प्रवासाचा आनंद घेऊ शकता. गाईडसह तुमच्या प्रवासाची आणि स्थळांची माहिती मिळवून पुण्याच्या इतिहासाची माहिती देखील समजून घ्या