Cheapest Petrol In The World : काय सांगता!! पेट्रोल 2.50 रुपये लिटर? प्रवाशांची होतेय चांदी

Cheapest Petrol In The World
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Cheapest Petrol In The World। आजकाल पेट्रोल आणि डिझलच्या किमती १०० रुपयांच्या वर गेल्यात. साहजिकच प्रवास करणं म्हणजे आता काय खायचं काम राहिलेलं नाही. खास करून चारचाकी वाहनात इंधन टाकणं हे काय सर्वसामान्य प्रवाशांसाठी सोप्पी गोष्ट राहिलेली नाही. परंतु तुम्हाला माहितेय का? जगात असा एक देश आहे जिथे फक्त 2.50 प्रति लीटरने पेट्रोल मिळतंय. त्यामुळे कुठून कोणत्याही ठिकाणी प्रवास करणे येथील नागरिकांना चांगलंच परवडतंय. आम्ही तुम्हाला ज्या देशाबद्दल सांगतोय, त्या देशाचे नाव आहे इराण…

खरं तर इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे तुम्ही इराण बद्दल बरंच काही ऐकलं असेल, यातीलच एक गोष्ट म्हणजे इराण मधील कच्च्या तेलाचे उत्पादन… जगातील बहुतेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत, परंतु इराणमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत फक्त $0.029 आहे (Cheapest Petrol In The World) म्हणजेच अंदाजे 2.50 रुपये आहे. त्यामुळे इथल्या प्रवाशांना लाँग ड्राईव्ह साठी जाणे केव्हाही परवडतंय.

इराण मध्ये पेट्रोल इतकं स्वस्त का? Cheapest Petrol In The World

इराण मध्ये पेट्रोल खूपच स्वस्त (Cheapest Petrol In The World) आहे यामागील पहिले कारण म्हणजे इराणकडे प्रचंड तेलाचे साठे आहेत आणि त्याची स्वतःची रिफायनरी क्षमता आहे, जी आयातीवर अवलंबून नाही आणि उत्पादन खर्चात लक्षणीय घट करते. आणि दुसरं कारण म्हणजे पेट्रोलवर असलेले सरकारी अनुदान… इराण सरकार कच्च्या तेलाचा मोठा भाग घरगुती वापरासाठी राखीव ठेवते आणि त्यावर प्रक्रिया करते आणि ते जनतेला अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून देते. या २ कारणांमुळे इराणच्या जनतेला अवघ्या अडीच रुपयांत एक लिटर पेट्रोल मिळते.

इराणनंतर, लिबिया $0.031 प्रति लिटर, व्हेनेझुएला $0.035 प्रति लिटर, अंगोला $0.328 प्रति लिटर, इजिप्त $0.339 प्रति लिटर आणि अल्जेरिया $0.340 प्रति लिटर पेट्रोल विकते, त्यामुळे या देशातही वाहन चालकांना मोठा दिलासा मिळताना दिसतोय. आपल्या भारतात मात्र पेट्रोल आयात करावं लागते.. त्यावर असलेल्या वेगवेगळ्या टॅक्स मुळे भारतात पेट्रोलच्या किमती प्रचंड आहेत. येत्या काळातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. भारतात कधीही अडीच रुपये पेट्रोल दर होणार नाहीत हे सुद्धा सत्य आहे.