Airtel चे सर्वात स्वस्त प्लॅन्स!! अनलिमिटेड कॉलिंगसह देत आहेत अनेक मोफत सुविधा…

0
1
Airtel Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एअरटेल (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या ऑफर्स लॉन्च करत असते. आता एअरटेलने TRAI च्या आदेशानंतर ग्राहकांसाठी फक्त कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन सुरू केले आहेत. त्यामुळे हे प्लॅन्स फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. चला तर जाणून घेऊया या प्लॅनची सर्व माहिती.

509 रुपयांचा एअरटेलचा खास प्लॅन

एअरटेलकडून जारी करण्यात आलेल्या प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता देण्यात येत आहे या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि 90 फ्री एसएमएसची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. याबरोबरच Apollo 24/7 चे मोफत सबस्क्रिप्शन प्लॅन सोबत देण्यात आले आहे. यामध्ये तुम्ही मोफत हॅलो ट्यूनचा लाभ सहज घेऊ शकता. असे सर्व फायदे असणारा हा प्लॅन ग्राहकांसाठी परवडणारा आहे.

1999 रुपयांचा एअरटेलचा खास प्लॅन

एअरटेल आपल्या ग्राहकांना या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता देत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० फ्री एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. यासह Apollo 24/7 सर्कल मेंबरशिप आणि मोफत Hello Tunes ची सुविधा या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. यापूर्वी या प्लॅनमध्ये एअरटेलकडून 24GB चा डेटा देण्यात येत होता.

दरम्यान, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने मोबाईल कंपन्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लान सुरू करण्याचे आदेश दिले होते. ज्याचा इंटरनेटची सुविधा न वापरणाऱ्या ग्राहकांना फायदा होऊ शकेल. आता एअरटेलने आणलेल्या या सुविधा देखील फायदेशीर ठरत आहेत.