हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Prepaid Plans : टेलिकॉम कंपन्यांकडून महागड्या दरात दिले जाणारे रिचार्ज प्लॅन्स ग्राहकांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरते आहे. सध्याच्या काळात एकाच वेळी दोन सिम वापरणे महागले आहे. मात्र यादरम्यानच आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वास्तविक VI, Airtel, Jio आणि BSNL कडून अलीकडेच 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे काही स्वस्त रिचार्ज प्लॅन सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे जर आपल्याला कमी किंमतीत जास्त व्हॅलिडिटी असलेल्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल, तर हि बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. आज आपण कमी किंमतीत जास्त व्हॅलिडिटी असलेल्या रिचार्ज प्लॅन जाणून घेऊयात …
Jio चा प्लॅन
Jio कडे सर्वात स्वस्त प्लॅन 26 हा रुपयांचा आहे. यामध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहित 2 GB इंटरनेट डेटा मिळेल. मात्र या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा दिली जाणार नाही. त्यासाठी 28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला 62 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल. यामध्ये 6 GB इंटरनेट डेटा मिळेल. तसेच, जर कॉलिंग प्लॅनबाबत बोलायचे झाल्यास, Jio कडून 719 रुपयांमध्ये 84 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 2 GB डेटा दिला जातो आहे. या प्लॅनमध्ये डेली 100 एसएमएस देखील मिळतील. Prepaid Plans
BSNL चा प्लॅन
BSNL कडून 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये 20 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहित 100 मिनिटांचे व्हॉइस कॉलिंग मिळेल. कमी खर्चात व्हॉईस कॉलिंग आणि इंटरनेट वापरायचे असेल तर हा प्लॅन चांगला पर्याय ठरेल. तसेच 1 GB प्लॅनच्या बाबतीत, BSNL चा 87 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन चांगला आहे. यामध्ये 14 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहित अनलिमिटेड कॉलिंग, 1 GB इंटरनेट डेटा आणि डेली 100 एसएमएस देखील मिळतील. Prepaid Plans
Airtel चा प्लॅन
Airtel कडून देण्यात येणारा 99 रुपयांचा प्लॅन आपल्याला सेकंडरी सिमसाठी चांगला पर्याय ठरेल. यामध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहित 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 200 MB इंटरनेट डेटा देखील दिला जातो. Airtel च्या 3 महिन्यांच्या प्लॅनमध्ये 455 रुपयांचा रिचार्ज हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये 84 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहित अनलिमिटेड कॉलिंग आणि 6 GB डेटा तसेच 900 एसएमएस देखील मिळतात. Prepaid Plans
VI चा प्लॅन
VI कडून 98 रुपयांचा रिचार्ज प्लॅनमध्ये 15 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहित अनलिमिटेड कॉलिंग आणि 200 एमबी इंटरनेट डेटा मिळेल. मात्र, यामध्ये एसएमएसची सुविधा दिली जाणार नाही. VI च्या 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 28 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहित 200 एमबी इंटरनेट डेटा मिळेल. Prepaid Plans
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.myvi.in/prepaid/best-prepaid-plans
हे पण वाचा :
RBI कडून आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द !!!
FD Rates : ‘या’ 2 बँकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची एफडी योजना 1 ऑक्टोबरपासून बंद होणार*
T20 World Cup 2022 मधील टॉप 8 संघांच्या कर्णधारांच्या संपत्तीविषयी जाणून घ्या
Share Market मध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण, FMCG-ऑटो सेक्टरमध्ये वाढ
FD Rate : खाजगी क्षेत्रातील ‘या’ आघाडीच्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा