हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Cheapest Tourism Places। परदेशात पर्यटन करायचं म्हंटल कि खर्चिक बाब आली. परदेशातील जेवण खाणं, राहण्याची सोय, तिथलं फिरणे हे भारतीय रुपयांच्या तुलनेत खूपच महाग.. त्यामुळे अनेकजण इच्छा असूनही परदेशात जात नाहीत.. परंतु आता चिंता करू नका, आम्ही तुम्हाला अशा एका देशाबद्दल सांगणार आहोत ज्याठिकाणी तुम्ही अवघ्या १५०० रुपयांत एका दिवसाची सफर करू शकता. तुम्हाला राहण्या- खाण्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार नाही…
आम्ही तुम्हाला ज्या पर्यटन स्थळाबद्दल सांगत आहोत त्याच नाव आहे लाओस (Laos) .. हा देश आग्नेय आशियात आहेत. एक सुंदर आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेला हा देश स्वस्त पर्यटनासाठी ओळखला जातो. इथलं राहणे, खाणे आणि फिरणे इतकं स्वस्त आहे कि दुसऱ्या देशातील लोक याठिकाणी आवर्जून येतात. ;लाओस मध्ये राहण्याचा खर्च दिवसाला ४०० ते ५०० रुपये आहे. जेवणाचा खर्च ३०० ते ५०० रुपये आणि स्थानिक ठिकाणांना भेट देण्यासाठी वाहतुकीचा खर्चही ३०० रुपयांपर्यंत आहे.. एकूणच काय तर दररोज १२०० ते १५०० रुपयांत तुम्ही एका दिवसाचे पर्यटन सुरु शकता.
कोणकोणती पर्यटन स्थळे – Cheapest Tourism Places
लाओस मध्ये अनेक आकर्षक अशी पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये कुयांग समुद्री धबधबा, मेकाँग नदी, ४००० बेटे, कायाकिंग, ट्रेकिंग, ट्यूबिंग, गुहा टूर तुम्ही करू शकता. तसेच वेलनेस रिट्रीट, ध्यान आणि गावांचे शांत वातावरण तुमचा दिवस नक्कीच खास बनवेल. लुआंग प्रबांग, वांग व्हिएंग, पॅक्सी, नोंग खियाव, टेकक, ४००० बेटे ही लाओसमधील सर्वात परवडणारी अशी पर्यटन स्थळे आहेत. याठिकाणी तुम्ही अगदी कमी खर्चात पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. याठिकाणी जेवणाचा आणि राहण्याचा खर्चही इतर तुलनेत खूपच कमी आहे. म्हणूनच कि वाक्य दरवर्षी या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
तुम्हीही लाओसला जाण्याचा प्लॅन आखत असाल तर त्याठिकाणी पोचल्यानंतर खर्च कमी करण्यासाठी, बस, टॅक्सी किंवा स्कूटर सारख्या स्थानिक वाहतुकीचा वापर करा. धबधबे, गुहा आणि मंदिरे यासारख्या कमी खर्चातील पर्यटन स्थळांना भेटी द्या आणि मनसोक्त आनंद घ्या.




