हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । फूड सेफ्टी एंड स्टैंडडर्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) मे एक निवेदन सादर केले असून त्यामध्ये असे म्हटले आहे की, बर्ड फ्लू चा वायरस हा 70 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये तीन सेकंदात मरून जातो. त्यामुळे अंडी आणि मांस हे 70 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये शिजवले गेल्यास बर्ड फ्लू वायरस असला तरी तो मरून जाईल. त्यामुळे 70 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये अंडी आणि मांस शिजवल्याने खाणाऱ्याला बर्ड फ्लू ची लागण होणार नाही.
या आजाराची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये बऱ्याच कोंबड्यांना जिवंत मारण्यात आले. तसेच अंडी पुरून टाकण्यात आली. वेगवेगळ्या भागांमध्ये अंडी आणि मांस याची किंमत फार कमी झाली होती. भीतीचे वातावरण असल्यामुळे असे होणे स्वाभाविक असले तरी हे इतके भयंकर असून काही काळजी घेतल्यास बर्ड फ्लू च्या वायरस पासून सुरक्षा मिळू शकेल.
बर्ड फ्लू पासून वाचण्यासाठी काही पथ्य आणि नियम पाळल्यास हा रोग माणसाला होणार नाही. त्यापैकी काही पथ्य जसे अंडी आणि मांस सुरक्षित तापमानाला उकडून घेणे, मेलेल्या कोंबड्यांना आणि पक्षांना हाताने स्पर्श करणे टाळणे, पक्ष्यांच्या जास्त संपर्कात न येणे, बर्ड फ्लूची लक्षणे पक्षांमध्ये दिसून येत असतील तर ताबडतोब संबंधित व्यवस्थेला सूचित करणे. अशाप्रकारे बर्ड फ्ल्यू वर ताबा मिळवता येऊ शकतो आणि त्यापासून सुरक्षित राहता येऊ शकते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’